माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला व्हायचय आमदार! मनीषा कायंदेंनी कुणावर केला हल्ला?

74

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह हनिमूनला गेले आहेत का? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. ‘तुम्हाला भाजपाकडून आमदार व्हायचे आहे, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत, तुम्ही देशमुखांना शोधू शकत नाही का’, अशा शब्दांत मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांवर प्रति हल्ला केला.

अमृता फडणवीस भाजपावर दबाब आणतायेत 

मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की, अमृता वहिनींना भाजपाकडून आमदार व्हायचे आहे, प्रवक्ता व्हायचे आहे.  त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत. माजी गृहमंत्री हनिमूनला गेले की काय…? अमृता फडणवीस यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना कायंदे म्हणाल्या, ‘तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही शोधू शकता! सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती तुमच्याकडे नाही, असेही कायंदे म्हणाल्या.

(हेही वाचा : अमृता फडणवीस विचारतात, ‘देशमुख, परमबीर सिंग हनिमूनला गेलेत का?’)

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस? 

एक पोलिस आयुक्त असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चालले आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आसूड ओढले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.