Mahavikas Aghadi चा गोंधळात गोंधळ सुरूच..

Shiv Sena UBT चा दोन्ही मित्रपक्षांवर कुरघोडीचा प्रयत्न

133
Mahavikas Aghadi मध्ये वंचित आघाडीवरून नव्या वादाची ठिणगी?

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झाले असल्याचे जाहीर केले असले तरी अजून जवळपास १५-१७ जागांचा गोंधळ कायम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Mahavikas Aghadi)

घोषणेचा काही तासांतच बोजवारा

दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की आघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून आता शेवटची बैठक शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी (शप) प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये होईल आणि संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले जाईल. मात्र या घोषणेचा काही तासांतच बोजवारा उडल्याचे दिसून आले. (Mahavikas Aghadi)

वाद कायम

मात्र, काल १ मार्चला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील (Shiv Sena UBT) भांडणाची पोलखोल केली आणि आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले. आज शनिवार २ मार्चला, ४८ लोकसभा मतदार संघांपैकी केवळ ३३-३५ जागांवर एकमत झाले असून अन्य जागांवर वाद कायम असल्याचे उघड झाले. (Mahavikas Aghadi)

(हेही वाचा – Deep Cleaning : मशीद बंदर परिसरात रस्त्यांची सफाई, पण वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची साफसफाई कधी?)

मुंबईत उबाठाचा दोन जागांवर वाद

काँग्रेस आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) यांच्यात जवळपास १०-१२ जागांवर वाद असून राष्ट्रवादी (शप) पक्षाने ५-६ जागांवर दावा केला आहे. यवतमाळ, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, हिंगोली आणि शिर्डी यावर उबाठा आणि काँग्रेसमध्ये एकमत नाही तर सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि हातकणंगले या पाच जागांवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. ईशान्य मुंबई जागा उबाठा (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी दोघांना हवी आहे तर उत्तर पश्चिम जागेसाठीही उबाठा आणि काँग्रेसमध्ये घमासान आहे. (Mahavikas Aghadi)

उबाठाचा दोन्ही कॉँग्रेसवर कुरघोडीचा प्रयत्न

एकूणच आघाडीमध्ये उबाठा (Shiv Sena UBT) अन्य दोन्ही काँग्रेस पक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असून काँग्रेसचे पाय दगडाखाली असल्याने ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही,’ अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. (Mahavikas Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.