राज्यातील वाहतूक प्रकल्पांना मिळालाय ‘रेड सिग्नल’, कसे गाठणार ‘डेस्टिनेशन’?

120

राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान होण्यासाठी महाराष्ट्रात १६ प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. यात सर्वात जास्त चर्चेत असलेला पुणे रिंग रूट प्रकल्प २०२५ साली पूर्ण व्हावा, असे प्रस्तावित आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पासाठी केवळ १७ कोटी रुपये खर्च केला आहे. असे राज्याच्या २०२१-२०२२ आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे या प्रकल्पाची गती पाहिल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २०३० उजाडेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सध्या १४ प्रकल्प सुरू आहेत. त्यात महामुंबईतील ६ प्रकल्प आहेत.

प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती

  • वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प २००७-०८ ला सुरु झाला, या प्रकल्पाची किंमत ११ हजार ३३२ कोटी असून आतापर्यंत ४६० कोटी खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प २०२३-२४ ला पूर्ण होणार असे अपेक्षित आहे, मात्र या प्रकल्पाची गती मंदावली असून हा प्रकल्पही पूर्ण होण्यासाठी अनिश्चित काळ लागेल, अशी शक्यता आहे.
  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आवर्धन करण्याचा प्रकल्प २००९-२०१० मध्ये सुरु झाला, त्यासाठी ६ हजार ६९५ कोटी अंदाजित खर्च असून आतापर्यंत १ हजार ७३८ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही २०२२-२३ या अपेक्षित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही.

(हेही वाचा कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद)

  • समृ्द्धी महामार्ग प्रकल्प २०१६-१७ ला सुरु झाला. त्यासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. आतापर्यंत त्यावर ३९ हजार १४५ कोटी खर्च करण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग २०२१-२२ मध्ये सुरु होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप तो सुरु झाला नाही.
  • पुणे रिंगरुट प्रकल्प हा २०१६-१७ मध्ये सुरु झाला, त्यासाठी २६ हजार ८३१ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. परंतू दुर्दैवाने यासाठी आतापर्यंत केवळ १७ कोटी खर्च झाला असल्यामुळे हा प्रकल्प २०२४-२५ मध्ये सुरु होणे याची सुतराम शक्यता नाही.
  • ठाणे-घोडबंदर उन्नत मार्गाचे काम २०१६-१७ मध्ये सुरु केले, त्याकरता ३ हजार कोटी अंदाजित खर्च आहे, परंतु आतापर्यंत याकरता केवळ २ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अमर्याद काळासाठी रखडणार, अशीच शक्यता आहे.
  • भिवंडी-कल्याण-शिळफाटा उन्नत मार्गाचे काम २०१६-१७ मध्ये सुरु झाले, त्याकरता २ हजार ६०० कोटी रुपये अपेक्षित आहे. मात्र या प्रकल्पासाठीही ५ कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प २०२१-२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असला तरी या प्रकल्पही पूर्ण होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.
  • ठाणे खाडी पूल (टप्पा ३) या प्रकल्पाचे काम २०१६-१७ मध्ये सुरु झाला, त्यासाठी ७७५ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही २०२३-२४ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
  • विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्ग हा प्रकल्प २०२१-२२ पासून सुरु झाला, त्याकरता ३९ हजार ८४१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. परंतु त्यासाठी आतापर्यंत केवळ ७ कोटी खर्च झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणार आहे.

(हेही वाचा मॉलमध्ये लव्ह जिहाद? अशा प्रकारे हिंदू मुलींना केलं जातेय ‘टार्गेट’)

  • रेवस-रेडी किनार रस्ता हा प्रकल्प २०२१-२२ मध्ये सुरु झाला, त्याकरता ९ हजार ५७२ कोटी खर्च अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंत ३ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पालाही विलंब होणार आहे.
  • कोकण हरित महामार्ग हा प्रकल्प २०२१-२२ मध्ये सुरू झाला, त्याकरता ७१ हजार २९८ कोटी खर्च अपेक्षित आहे, मात्र त्यासाठी आतापर्यंत ४ कोटी रुपये खर्च झाला आहे, म्हणून हा प्रकल्पही रखडणार आहे.
  • जालना-नांदेड महामार्गाचा प्रकल्प २०२१-२२ मध्ये सुरु झाला, त्यासाठी ६ हजार ६१२ कोटी रुपये अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत केवळ १ कोटी ६४ हजार रुपये खर्च आहे, या प्रकल्पासाठी केली जाणारी तरतूद पाहता हा प्रकल्पही दीर्घकाळ रखडणार आहे, हे दिसत आहे.
  • वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्प २०२१-२२ ला सुरु झाला असून त्याकरता ३२ हजार २१२ कोटी अपेक्षित खर्च आहे. त्याकरता आतापर्यंत केवळ ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रकल्पही दीर्घकाळ रखडलेला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.