स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

78

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या 19 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये प्रस्तावित असणा-या या निवडणुकांना आता राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

राज्यात 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणा-या या निवडणुकांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 19 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याला राज्यातील सर्वच पक्षांकडून विरोध करण्यात येत होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 19 जुलै रोजी होणा-या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले असून, या निकालानंतरच हा निवडणुका नव्याने जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.

निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे

‘अ’ वर्ग: जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.

‘ब’ वर्ग: नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.

‘क’ वर्ग: नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.

नगरपंचायती: अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.