मनसे उधळणार राहुल गांधीची सभा; मनसैनिक शेगावमध्ये दाखल

83

काॅंग्रेस नेते राहुल गांधी हे भारत दौ-यावर असून, सध्या ते महाराष्ट्रात आहेत. यादरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले त्याने वाद पेटला आहे. राहुल गांधींच्या या विधानानंतर आता मनसेने राहुल गांधींची शेगावमध्ये असलेली सभा उधळण्याचा इशारा दिली आहे. यासाठी महाराष्ट्रातून मनसैनिक शेगामध्ये दाखल झाले आहेत.

( हेही वाचा: वीर सावरकरांबद्दलचं वक्तव्य पडलं महागात; राहुल गांधींविरोधात शिंदे गटाची पोलिसांत तक्रार )

शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा आहे. ही सभा उधळून लावण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते शेवगावमध्ये दाखल झाले आहेत. संदीप देशपांडे, प्रकाश महाजन आणि नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली असून, यामध्ये रणनीती ठरवण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी काॅंग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.

मनसे शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवणार

राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिका-यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.