अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

116

शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु झाला आहे.  अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पाय-यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

( हेही वाचा: International Women’s Day 2023: जागतिक महिला दिनी राज ठाकरेंचं फेसबूक पोस्टच्या माध्यामातून महिलांना आवाहन )

अर्थमंत्री सादर करणार अर्थसंकल्प 

महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरुन स्पष्ट होईल. राज्याचा अर्थसंकल्प उद्या, गुरुवारी सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.