कॉंग्रेसने वीर सावरकरांचा अपमान केला तेव्हा मोर्चा का नाही काढला? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

97

मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला. यादरम्यान झालेल्या सभेमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : Breaking news: घाटकोपरमध्ये रुग्णालयात भीषण आग; अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न)

महाविकास आघाडीचा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. जे लोक संतांना शिव्या देतात ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे सुद्धा माहिती नाही ते आज मोर्चा काढत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान जेव्हा कॉंग्रेसने केला तेव्हा तुम्ही मोर्चा का नाही काढला असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केला आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेली ६० वर्ष सुरू आहे. निव्वळ मुद्दे न उरल्यामुळे राजकीयदृष्ट्या काढण्यात आलेला हा मोर्चा आहे असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान नेहमी राहतील अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

पक्षाप्रमाणे मोर्चाही नॅनो होता…

उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती त्यांच्या भाषणात एकही नवा मुद्दा नव्हता. ज्यांना स्वत:चं सरकार टिकवता आले नाही त्यांच्या नाकाखालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. तीन पक्ष एकत्र येऊनही एवढा लहान मोर्चा निघाला, आज कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत कारण हा मोर्चा ड्रोनशॉट लायक नव्हताच, आम्ही त्यांना आझाद मैदानावर येण्याची विनंती केली होती परंतु त्यांनाही माहिती होतं त्यांच्याजवळ आझाद मैदान भरेल एवढी संख्या नव्हती म्हणून रस्ता निमुळता होतो अशी जागा त्यांनी निवडली, त्यांच्या पक्षाप्रमाणे मोर्चाही नॅनो होता अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.