Maharashtra Politics : राष्ट्रवादीविना लढण्याची काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून चाचपणी?

100
Maharashtra Politics : राष्ट्रवादीविना लढण्याची काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून चाचपणी?

शरद पवार यांची अजित पवार आणि भाजपासंदर्भातील (Maharashtra Politics) भूमिका अद्यापही स्पष्ट होत नसल्याने राष्ट्रवादीविना लढण्याची चाचपणी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून केली जात आहे. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यात ‘मातोश्री’वरील बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याचे कळते.

शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शनिवारी उद्योजक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी गुप्त बैठक (Maharashtra Politics) पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपाने शरद पवार यांना कृषिमंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी नाना पटोले यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस हायकमांड लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा करतील, अशी माहिती काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

(हेही वाचा – Congress : तांबे कुटुंबाला सन्मानाने पक्षात घेणार; विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसची खेळी)

तत्पूर्वी, शरद पवारांविना (Maharashtra Politics) लढल्यास काय चित्र असेल, याचा अंदाज काँग्रेस हायकमांडकडून घेतला जात आहे. कारण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून दगा झाल्यास मोठा फटका बसू शकतो, याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीऐवजी ठाकरे गटाला प्राधान्य देण्याची सूचना दिल्लीतून करण्यात आली आहे. ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा करून घेण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी अनुकूल आहेत. त्यामुळे या नव्या समीकरणाला राज्यात कसा प्रतिसाद मिळू शकतो, याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मविआत संभ्रम

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही (Maharashtra Politics) शरद पवार गटाने अजित पवार आणि इतर आमदारांविरोधात याचिका दाखल केलेली नाही. विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. किंबहुना अजित पवार आणि गटाविरोधात ठोस भूमिका घेतलेली नाही. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत किंवा राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांवेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर बडगा उगारला नाही. याउलट अजित पवार किंवा त्या गटाच्या नेत्यांसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवादमालिका सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडीत संभ्रम आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.