
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक समोर आले असून, यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी बाजी मारली आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या मूल्यमापनात पहिल्या पाच मंत्रालयीन विभागांमध्ये ‘दादा’ (अजित पवार) आणि ‘भाऊ’ (देवेंद्र फडणवीस) यांच्या मंत्र्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर ‘भाई’ (एकनाथ शिंदे) यांच्या मंत्र्यांना अजून मेहनत घ्यावी लागेल, असे चित्र दिसते. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – Maharashtra Day : शौर्याची परंपरा; शिवकालीन मर्दानी खेळ)
महायुती सरकारने (Mahayuti Government) सत्तेत आल्यानंतर सर्व ४८ विभागांना १०० दिवसांचा टास्क दिला होता. या काळात धोरणात्मक निर्णय, नवीन योजना आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीला चालना आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा १० मुद्यांवर मूल्यमापन झाले. यात पहिल्या पाच जिल्हा परिषदांमध्ये ठाणे (९२.०), नागपूर (९१.४३), नाशिक (९१.४३), पुणे (९१.४३) आणि वाशिम (९२.०) यांनी आघाडी घेतली. महापालिका आयुक्तांमध्ये उल्हासनगर (६४.२२), पिंपरी-चिंचवड (६४.९२) आणि पनवेल (९१.४३) अव्वल ठरले, तर विभागीय आयुक्तांमध्ये कोकण (९४.४३) आणि नाशिक (६२.२२) यांनी बाजी मारली. पोलिस आयुक्तांमध्ये मीरा-भाईंदर (६४.४९), ताणे (९६.४९) आणि मुंबई रेल्वे (९३.४३) यांनी चमकदार कामगिरी केली. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या यशस्वी अधिकाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले, “५ मंत्रालयीन सचिव, ५ आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलिस अधीक्षक, ५ मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ महापालिका आयुक्त, ३ पोलिस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांनी प्रभावी कामगिरी करून प्रशासनाला गतिमान आणि लोकाभिमुख बनवले.” त्यांनी या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या निकालावरून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community