येशील येशील येशील ‘दादा’ पहाटे पहाटे येशील; आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेशील

83

सध्या महाराष्ट्रातील विरोधकांना एक गोड स्वप्न पडू लागलं आहे. ज्याप्रमाणे अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळलं, त्याप्रमाणे हे नवीन सरकार देखील लवकरात लवकर पडेल असं सर्वांना वाटतंय. मुळात हे सरकार का पडेल? तर शिंदे गटतील असंतोषामुळे आणि चुकांमुळे हे सरकार पडू शकतं. पण त्याआधी जर काँग्रेस राष्ट्रवादीमधले आमदार फुटले तर?

( हेही वाचा : फ्लेमिंगो पर्यटनाला आता जलमार्गाची जोड; बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईट सेवा लवकरच)

अजूनही अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा अधूनमधून होत राहते. शिंदे-फडणवीस सरकारवर दादा तसे मनापासून टीका करत नाहीत. ज्या आवेशाने इतर नेते घसरतात, दादांच्या टीकेमध्ये तो आवेश दिसत नाहीत. आजही दादांना पहाटेच्या शपथविधीवरुन चिडवलं जातं. त्यामुळे विरोधकांनी सरकार पडेल अशी आशा मनात धरु नये. कारण दादा पहाटेच्या प्रवेशाची वाट पाहतच आहेत.

समजा विरोधकांच्या बोलण्यानुसार जर हे सरकार पडलं आणि अजित दादा राष्ट्रवादीतून आमदार फोडण्यास यावेळी यशस्वी झाले तर? म्हणजे अजित दादा राष्ट्रवादीतले एकनाथ शिंदे ठरले तर विरोधक काय करणार आहेत? महाराष्ट्रात कोणता विरोधी पक्ष मजबूत राहणार आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाची अवस्था बिकट आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीची बाजू सध्या मजबूत आहे. मनसेला अजून खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे विरोधकांनी उगाच मध्यावधीची स्वप्ने पाहू नये. कारण यामुळे उरली सुरली महाविकास आघाडी देखील विस्कळीत होईल. त्यापेक्षा २०२४ च्या तयारीला लागावं आणि शिंदे-फडणवीसांना कशाप्रकारे रोखता येईल याची योजना आखवी. कारण अजित दादा पवार अजूनही ‘त्या’ पहाटेच्या प्रतीक्षेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.