राज्यात 7 हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! मतदान सुरू, सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात

100

राज्यातील विविध जिल्ह्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रित निवडणुकांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निकाल मंगळवारी २० डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – महाविकास आघाडीच्या मोर्चाला पैसे वाटून लोकांना आणले? भाजपने व्हिडिओ ट्वीट करत केला आरोप)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त जिल्हे वगळून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी आपापल्या ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे.

जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायती

अहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३, उस्मानाबाद- १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा – ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशिम- २८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक- १९६. अशा एकूण ७ हजार ७५१ जागी ग्रामपंचायतीची रणधुमाळी असणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.