अर्धा डझन मंत्र्यांना लागली दुबईवारीची घाई!

70

राज्यातील जनता इंधन दरवाढीमुळे त्रस्त असतानाच, ६ मंत्री आणि तब्बल ५४ अधिकारी हे दुबईवारीवर जाण्याच्या तयारीत आहेत. राज्याची तिजोरी खाली असताना कोट्यवधी निधी मंजूर करण्यासाठी मंत्र्यांची धडपड दिसून येत आहे. दुबईला जाण्यासाठीचे मुख्यमंत्री कार्यालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

दौऱ्यासाठी निधी मंजूर करावा

राज्यातील अनेक समस्या प्रलंबित असताना मंत्र्यांना मात्र दुबईचे वेध लागले आहेत. मंत्रालयातील काही मंत्री परदेशात रवाना झाले आहेत, तर त्यांच्या खात्यातील ५४ अधिकाऱ्यांनीही परदेशवारीसाठी विनवणी केली आहे. दौऱ्याच्या एक दिवस आधी या मंत्र्यांच्या विनंती अर्जावर योग्य निर्णय घेऊन तो तोंडी कळविण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे. या दौऱ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करावा यासाठी या मंत्री व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव आणि थेट केंद्र सरकारला गळ घातली आहे.

( हेही वाचा : आता शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही! )

मुख्यमंत्र्यांची नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र यावर विशेष नाराज असल्याचे कळत आहे. ही संख्या आटोक्यात आणावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्याचे समजते आहे. सरकारी खर्चानेच हे सगळे मंत्री दुबईला जाणार आहेत. दुबई एक्स्पोतमध्ये ७० देश सहभागी होत आहेत. भारतातल्या राज्यांनी तेथे जावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसेच त्याकरता प्रत्येक राज्याला दिवस वाटून दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.