दादरमध्ये पोलिस दुकाने बंद करतायेत, हा शासन पुरस्कृत बंद! मनसेचा घणाघात

मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. 

111

संसदेत शेतकरी कायद्याचे बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते? शिवसेना खासदारांची थोबाडे बंद का होती? शरद पवार संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीचे दिवस आहेत, या काळात थोडा बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही शासन पुरस्कृत बंद करत आहात. दादरमध्ये पोलिस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलिस वापरावे लागत आहेत. पोलिस दुकाने बंद करीत आहेत, अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?

मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून द्यायला हवे. लोकांनी बंद उत्स्फूर्तपणे पाळला पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे पोलिस जर दुकाने बंद करायला फिरत असतील, तर जनतेच्या मनात काय आहे ते दिसतेय आणि आम्ही जनतेबरोबर आहोत, असेही संदीप देशपांडे म्हणाले.


(हेही वाचा : महाराष्ट्र बंद : दादर मार्केट सुरु, बेस्ट सेवा बंद!)

हिम्मत असेल तर खासदारांनी संसदेत गोंधळ घालावा!

भाजप आणि मनसेचा बंदला विरोध हा योगायोग नाही. जी गोष्ट बरोबर ती बरोबर, जी चूक ती चूकच..हिम्मत असेल तर खासदारांनी संसदेत गोंधळ घालावा. मुख्यमंत्री दिल्लीला जातात.  मोदींशी गुलुगुलु गप्पा मारतात, मग त्यावेळी एखाद्या घटनेवर का नाही निषेध व्यक्त केला? एवढ्या विरोधानंतर पालघरची जागा बुलेट ट्रेनसाठी देऊन टाकली. म्हणजे तुमची भूमिका काय आहे? भाजपने थोडा डोक्यावरून हात फिरवला, चुचकारले की शिवसेनेचा विरोध मावळतो. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. त्यांना मदत पोहचली आहे का? ज्यावेळी भाजप चुकले तेव्हाही राज ठाकरे भाजप विरोधात बोललेले आहेत, असेही देशपांडे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.