Maharashtra Assembly winter Session : विरोधकांचा मनसुबा सत्ताधारी उधळणार; काय असणार सरकारचा ‘प्लॅन’?

168

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly winter Session) आदल्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारला अडचणीत आणण्याचा मनसुबा विरोधकांनी आखला आहे, अशा वेळी मात्र सरकारकडून विरोधकांचा हा मनसुबा उधळवून लावण्याची तयारी सुरु झाली आहे, असे चिन्ह आहे. या अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांवर चोख उत्तर देतानांच सरकार हे अधिवेशन धोरणात्मक निर्णय घेऊन गाजवणार, अशी माहिती आहे.

यासंबंधीचे सूचक विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले. ठाकरे गटाने सरकारवरील विविध आरोपांमुळे हिवाळी अधिवेशन  (Maharashtra Assembly winter Session) वादळी ठरणार असल्याचा दावा केला आहे. पण हे अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी गाजणार ठरेल. उबाठा गटाने काय आरोप केले, काय प्रत्यारोप केले, यावर हे अधिवेशन चालणार नाही. या अधिवेशनात सरकारच्या अजेंड्यावर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार हे प्रश्न हातावेगळे करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करेल, असे संजय शिरसाट म्हणाले.

(हेही वाचा Maharashtra Assembly winter Session 2023: नागपुरात राजकीय ‘पारा’ चढणार)

शेतकऱ्यांना दिलासा

संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे. यासंबंधी सरकारने मंत्रिमंडळ व सहकाऱ्यांची एक विशेष बैठकही बोलावली आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाईल.

आरक्षणाच्या मुद्यावर ठोस निर्णय 

सध्या महाराष्ट्रात मराठा, धनगर व ओबीसी समाजाची आंदोलने सुरू आहेत. यावरही सरकार एखादी ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे. याकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.