Ajit Pawar : चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; थेट महापालिका आयुक्तांना केला फोन

तेथील नारळी बागेतही नाईक खेळणी तुटलेल्या अवस्थेत होती. तसेच अस्वच्छता दिसल्यामुळे अधिकाऱ्यांनाही जाब विचारला इतका निधी देऊन देखील बागेची अवस्था अशी का असाही सवाल पवार यांनी यावेळी विचारला

268
Ajit Pawar : चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; थेट महापालिका आयुक्तांना केला फोन
Ajit Pawar : चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; थेट महापालिका आयुक्तांना केला फोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर (Dadar Chaityabhumi) येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळीच चैत्यभूमीवर हजेरी लावली. गॅलरी अस्वच्छ असल्याने अजित पवारांनी थेट मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना या संदर्भात फोन करून विचारणा केली. तर गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही अधिकाऱ्यांना झापलं आहे. (Ajit Pawar)

अजित पवार यांना प्रेक्षक गॅलरीमध्ये अस्वच्छता निदर्शनास आली. यावरुन ते काहीसे संतापले. सकाळी लवकर कार्यक्रमस्थळी येऊन अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना प्रेक्षक गॅलरीत अस्वच्छता दिसली. यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेकडून याची तयारी करण्यात येते. (Ajit Pawar)

(हेही वाचा :Election: तीन राज्यांत मुख्यमंत्री निवडीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक, भाजपचा ‘फॉर्म्युला ६५’)

लाखो अनुयायी या ठिकाणी येतात मात्र गॅलरी अस्वच्छ असल्याच्या तसेच अनेक तक्रारींचा पाढा स्थानिकांनी अजित पवारांसमोर वाचला. त्यानंतर अजित पवारांनी थेट महापालिका आयुक्त इक्बाल सिंहाना फोन करून या संदर्भात विचारणा केली. अजित पवारांच्या फोननंतर काही मिनिटातच इक्बाल सिंह तेथे पोहचले. तर तेथील नारळी बागेतही नाईक खेळणी तुटलेल्या अवस्थेत होती. तसेच अस्वच्छता दिसल्यामुळे अधिकाऱ्यांनाही जाब विचारला इतका निधी देऊन देखील बागेची अवस्था अशी का असाही सवाल पवार यांनी यावेळी विचारला.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.