Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी काँग्रेसवर खवळल्या उपकाराची भाषा भोवणार

115
Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी काँग्रेसवर खवळल्या उपकाराची भाषा भोवणार
Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी काँग्रेसवर खवळल्या उपकाराची भाषा भोवणार
काँग्रेसने उपकाराचा भाषा वापरायला सुरुवात केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) यांच्या तळपायाची आग (Lok Sabha Election 2024 ) मस्तकात गेली आहे. त्या आता काँग्रेससाठी (congress) एकही जागा सोडण्यास तयार नाहीत. आधी त्यांनी काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु आता बंगालच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. (Lok Sabha Election 2024 )

काँग्रेससाठी दीदी एका मृगजळासारख्या झाल्या आहेत. दीदींनी आधी काँग्रेसला (congress) लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 ) दोन जागा देऊ केल्या होत्या. याची अंमलबजावणीची वेळ जवळ येताच दीदींचे वचन मृगजळासारखे गायब झाले आहे. तृणमूल काँग्रेस बंगालमधील सर्व 42 जागा लढविणार असल्याचा पुनरूच्चार ममता बॅनर्जी  (Mamta Banerjee) यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Raj Thackeray: तुतारी निशाणी मिळाली तर ती फुंका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली शरद पवारांवर टीका )

काँग्रेसस उपकार दाखवित आहे
तृणमूल काँग्रेसमधील (Trinmul congress) सूत्राने सांगितले की, ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आधी काँग्रेससाठी दोन जागा सोडण्यास तयार होत्या. तसा प्रस्ताव सुध्दा काँग्रेसला (congress) दिला होता. परंतु, काँग्रेस आता उपकाराची भाषा बोलू लागला आहे. यामुळे दीदी प्रचंड नाराज झाल्या आहेत. याचा परिणाम जागावाटपाच्या मुद्यावर झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

ममता बॅनर्जीला खासदार आम्ही बनविले

काँग्रेसचे (congress) संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee)यांच्या  जिव्हारी लागेल असे विधान केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस (congress) आणि तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinmul congress) जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपला हरविणे हा इंडी आघाडीचा मुख्य हेतू आहे. यामुळे इंडी आघाडी मजबूत करायची आहे. (Lok Sabha Election 2024)

यानंतर जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसने (congress) नेहमीच ममता बॅनर्जी  (Mamta Banerjee) यांचा  आदर केला आहे. सर्वप्रथम काँग्रेसनेच त्यांना खासदार केले होते आणि काँग्रेसच्या मदतीनेच त्यांनी खूप प्रगती केली. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्या पक्षाचे नाव आजही तृणमूल काँग्रेस आहे. अगदी पक्ष सोडल्यानंतर त्यांची विचारधारा अजूनही काँग्रेसशी (congress) जोडलेली आहे. (Lok Sabha Election 2024)

उपकाराची भाषा ऐकून दीदी खवळल्या
सर्वप्रथम खासदार बनविल्याची आणि काँग्रेसच्या मदतीने खूप प्रगती केल्याचा काँग्रेसचा (congress) दावा ऐकून दीदी प्रचंड नाराज झाल्या असल्याचे समजते. यामुळे आधी काँग्रेसला (congress) दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविणाऱ्या दीदींनी आता राज्यातील सर्व 42 जागा लढविण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी  स्वत: केली नसली तरी त्यांचे निकटचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ही घोषणा केली आहे. (Lok Sabha Election 2024)

42 जागांवर निवडणूक लढवणार
टीएमसी नेते डेरेक ओब्रायन म्हणाले, की ” टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी सांगितले होते की टीएमसी बंगालमधील सर्व 42 जागांवर निवडणूक लढवत आहे. आम्ही आसाममधील काही जागांवर आणि तुरा लोकसभा जागेवर लढत आहोत. मेघालयमध्ये सुध्दा  आम्ही आमचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरवू.”

थोडक्यात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या झोळीत मोजक्या जागांचे दान टाकले असले तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) काँग्रेसवर दया दाखविण्याच्या मूडमध्ये नाही आहेत.

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.