Lok Sabha Results : जातीय समीकरण राहुल शेवाळे यांच्या विरोधात गेले

353
Lok Sabha Results : जातीय समीकरण राहुल शेवाळे यांच्या विरोधात गेले

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण शिवसेना उबाठा गटाच्या अनिल देसाई यांच्या पथ्यावर पडले तर शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विरोधात गेले. (Lok Sabha Results)

ध्रुवीकरण पाच विधानसभा मतदार संघांत

ज्याप्रमाणे काही मतदार संघांमध्ये हिंदू उमेदवारांच्या विरोधात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन एकगठ्ठा मतदान झाले तसे शेवाळे अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असले तरी बौद्ध नसल्याने महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात मतांचे धृवीकरण झाले. शेवाळे यांच्या विरोधात दलित मतांचे धृवीकरण झाल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी धारावी, चेंबूर, अनुशक्ती नगर, वडाळा, सायन-कोळीवाडा या पाच मतदारसंघात दलित मतदारांनी शेवाळे यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा उमेदवार अनिल देसाई यांना मतदान केले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या धारावी मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. (Lok Sabha Results)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: राम मंदिर असलेल्या आयोध्येत भाजपा पराभूत, मात्र राम जिंकले)

सवर्ण असल्याचा प्रसार

राहुल शेवाळे जातीने दलित असले तरी बौद्ध नसल्याने त्यांच्याबाबत ते सवर्ण असल्याचा प्रसार मतदार संघात करण्यात महाविकास आघाडीला यश आले आणि त्याचा फटका शेवाळे यांना जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. (Lok Sabha Results)

देसाई ५३,३८४  मतांनी विजयी

दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाची मतमोजणी झाली त्यात अखेरच्या २१ व्या फेरीअंती शिवसेना उबाठाचे अनिल देसाई ५३,३८४  मतांनी विजयी झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी विकास पानसरे यांनी केली. राहुल शेवाळे यांना ३.४१ लाख मते मिळाली तर ३.९५ लाख मते अनिल देसाई यांच्या पारड्यात पडली. (Lok Sabha Results)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.