Lok Sabha Election Result 2024: राम मंदिर असलेल्या आयोध्येत भाजपा पराभूत, मात्र राम जिंकले 

233
Lok Sabha Election Result 2024: राम मंदिर असलेल्या आयोध्येत भाजपा पराभूत, मात्र राम जिंकले 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) मतदानाचे निकाल मंगळवारी दिवसभर जाहीर होत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश येथील फैजाबाद (faizabad Lok Sabha 2024) जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिर भाजपाच्या मेहनतीमुळे २०२४ या वर्षांच्या सुरुवातीला मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र याच भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. (Lok Sabha Election Result 2024)

लोकसभा २०२४ च्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेष प्रसाद यांचा ५४ हजार ७६७ मतांनी विजय झाला असून, मेहनती भाजपाचे उमेदवार लालू सिंग (BJP candidate lalu sing) यांना मात्र दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवरून प्रसिद्ध बॉलीवूड गायक सोनू निगमने एक्सवर अयोध्यावासियांना टोला लगावणारी पोस्ट केली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अरुण गोविल हे ५ लाख ४६ हजार मतांनी त्यांचा विजय झाला असून गोविल यांच्या विरुद्ध समाजवादी पार्टीचे सुनीता वर्मा यांना ५ लाख ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. पोस्टल मतपत्रिकेच्या मोजणीत आघाडीवर असलेले अरुण गोविल पिछाडीवर होते.  (Lok Sabha Election Result 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.