Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको

मुंबईतील हाय-प्रोफाईल लोकसभा मतदार संघ समजला जाणाऱ्या दक्षिण मुंबईत सत्ताधारी महायुतीचा उमेदवार कोण असणार यांची कमालीची उत्सुकता जशी जनतेला, पत्रकारांना लागली आहे तशी भाजपच्या दोन विद्यमान आमदारांनाही लागली आहे.

260
Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको
Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको
  • सुजित महामुलकर

लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी जंग-जंग पछाडणाऱ्यांची या देशात कमी नाही. अशा परिस्थितीत भाजपचे दक्षिण मुंबईतील दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदार जणू लोकसभेचे तिकीट मिळू नये म्हणून ‘देव पाण्यात’ ठेऊन बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Lok Sabha Elections)

राज्याच्या राजकारणात अधिक रस

मुंबईतील हाय-प्रोफाईल लोकसभा मतदार संघ समजला जाणाऱ्या दक्षिण मुंबईत सत्ताधारी महायुतीचा उमेदवार कोण असणार यांची कमालीची उत्सुकता जशी जनतेला, पत्रकारांना लागली आहे तशी भाजपच्या दोन विद्यमान आमदारांनाही लागली आहे. या दोन्ही आमदारांना राज्याच्या राजकारणात अधिक रस असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोघांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे समजते. मात्र हे दोनही आमदार लोकसभा निवडणूक लढविण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येते. त्यात जर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी महायुतीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास सगळ्यात जास्त आनंद या आमदारांना होईल, यात शंका नाही. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Gautam Adani Back on Top : मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती)

देवरा कुटुंबाचा प्रभाव

दक्षिण मुंबई या मतदार संघातून गेल्या दोन निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत मोदी लाटेवर निवडून आले तर त्याआधी दोन निवडणुकीत (२००४ आणि २००९) कॉँग्रेसचे मिलिंद देवरा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. १९८४ पासून २००४ पर्यंत झालेल्या सहा निवडणुकांमध्ये दोनदा भाजपच्या जयवंतिबेन मेहता तर तब्बल चार वेळा मिलिंद यांचे वडील मुरली देवरा यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला होता. (Lok Sabha Elections)

काँग्रेसची स्थिती कमकुवत

एकूणच देवरा कुटुंबाचा या मतदारसंघावर प्रभाव असला तरी सध्या काँग्रेसची स्थिति अत्यंत कमकुवत आणि मतदार पक्षाला किती साथ देतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. देवरा काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजप किंवा राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपचे विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. या दोनपैकी एकाला लोकसभेचे तिकीट मिळाल्यास दक्षिण मुंबईतील दोन्ही आमदारांना ‘सुंठीवाचून खोकला गेल्याचे’ समाधान नक्की मिळेल, यात शंका नाही. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मिळाले राम मंदिराच्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याचे आमंत्रण)

मनसेकडून नांदगावकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी आमदार बाळा नांदगावकार या भागात सक्रिय झाले असून त्यांनी लोकसभेच्या प्रचाराला पोस्टर्स लाऊन सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच मैदानात उतरवण्यात येणार असल्याची चिन्हे आहेत. (Lok Sabha Elections)

सहापैकी दोन आमदार भाजपचे

या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी दोन (मलबार हिल आणि कुलाबा) हे भाजपकडे असून अनुक्रमे मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या मतदार संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर भायखळा येथे शिवसेनेच्या यामिनी जाधव, मुंबादेवी मतदार संघात काँग्रेसचे अमिन पटेल आणि उर्वरित दोन मतदार संघात, वरळी आणि शिवडी, या मतदार संघात उबाठाचे आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी हे आमदार आहेत. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.