Lok Sabha Elections : संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांवर ‘निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप’

121
Lok Sabha Elections : संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांवर ‘निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे प्रवक्ते आणि ‘सामना’ या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले, असा थेट आरोप दैनिक ‘सामना’तून केला. तसेच एकीकडे ‘लोकांनी पैसे घेतले’ असे सांगतानाच इंडी आघाडीस ३०० च्या जवळपास जागा मिळतील, ईडी, सीबीआय राहुल गांधींच्या दरात भेटीसाठी उभे राहतील’, असे असंबद्ध लिखाण राऊत यांनी केले आहे. (Lok Sabha Elections)

संविधानिक पदाचा अपमान

भारतीय राज्यघटनेत मुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद असून या पदावरील व्यक्तिविरुद्ध कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे संविधानिक पदाचा अपमान आहे. संजय राऊत यांनी तर त्यांच्या ‘सामना’तील उत्सव या पुरवणीतील ‘रोखठोक’ या स्तंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर थेट आरोप केले आहेत. ‘एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदार संघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट,’ असे लेखात म्हटले आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसंबंधी Sanjay Shirsat यांचे महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले…)

जनतेवरच भ्रष्टाचाराचे आरोप

राऊत यांनी जनतेवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि इंडी आघाडीच्या तीनशेच्या जवळपास जागा देशभरात मिळतील, असेही याच लेखात म्हटले. ‘लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेलाही भ्रष्ट केले,’ असे म्हटले आहे तरी लोक इंडी आघाडीला देशात तिनशेपर्यंत जागा निवडून देतील, असेही विधान केले. ‘सत्तांतर शांतपणे आणि सुरळीत होईल. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसप्रमुख दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांच्या दारात भेटीसाठी उभे राहिल्याचे चित्र दिसेल,’ असे दिवास्वप्न विचार राऊत यांनी या लेखात मांडले, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Lok Sabha Elections)

राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले होते

राऊत यांनी त्यांच्या स्तंभातून अकलेचे तारे तोडले आणि ते भ्रमिष्ट अवस्थेत स्तंभ लिहीत असावेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. राऊत यांनी स्वतः २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले होते, त्यावरही त्यांनी एक रोखठोक लिहावे. ज्यांनी गटातटाचं राजकारण केलं त्यांना भाजपाचा परिवार काय कळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.