इंडि आघाडीला जर सत्ता मिळाली तर काय करतील त्रिसूत्री? PM Narendra Modi म्हणाले..

117

विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले की, हे लोक त्यांचे मूळ तीन कट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. एक म्हणजे संविधान बदलून भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण असेल असे लिहिले जाईल. दुसरे म्हणजे, एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे आणि तिसरे म्हणजे मुस्लिमांना धर्माच्या आधारावर संपूर्ण आरक्षण देण्याची योजना आहे. निवडणुकीच्या काळात इंडिया आघाडीचे लोक मंदिरांना भेटी देण्याचे नाटक करतात, पण ५०० वर्षांनंतर, जेव्हा आपल्या आस्थेचा इतका मोठा क्षण आला तेव्हा त्यांनी राम मंदिराला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्यात त्रुटी शोधायला लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

पूर्वांचल गेल्या ७ वर्षांपासून यूपीचे मुख्यमंत्री निवडत आहे

देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर प्रदेशातील घोसी येथे सभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्वांचल गेल्या १० वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानांची निवड करत आहे आणि पूर्वांचल गेल्या ७ वर्षांपासून यूपीचे मुख्यमंत्री निवडत आहे, त्यामुळे पूर्वांचल हे सर्वात खास असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. घोसी, बलिया आणि सलेमपूरमधील लोक फक्त खासदार निवडत नाहीत, तर ते पंतप्रधान निवडतात, असे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा Lok Sabha Election : दिल्लीत भाजपाला किती जागा मिळणार? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली भविष्यवाणी)

समाजवादी पार्टीवरही नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. समाजवादी पार्टीने नेहमीच षड्यंत्राखाली मागासलेला राहिला, मात्र आता माफियांसाठी अश्रू ढाळणाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही, सर्व जातींनी आपापसात लढावे अशी इंडि आघाडीची इच्छा आहे. राजपूत, ब्राह्मण, राजभर, दलित, कायस्थ या सर्वांनी आपापसात लढून कमकुवत व्हावे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंडि आघाडीचा फायदा काय होईल? तर जेव्हा समाजातील लोक एकत्र नसतील तेव्हा तुमचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून विचलित होईल, असे नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.