Lok Sabha Election Result 2024: भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना दे धक्का!

293
Lok Sabha Election Result 2024: भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना दे धक्का!

१८ व्या लोकसभा मतदानाचा निकालसत्र मंगळवार सकाळपासून सुरू आहे. यावेळी सर्वांच्या नजरा या राज्यासह इतर निवडणुकीच्या मतदानांकडे लागले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही (NDA) आघाडीवर होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासूनच ज्या प्रकारे ४०० चा नारा देत होते, ते होताना दिसले नाही. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) २९३ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडीला (india alliance) २३३ जागांवर अजून तरी स्थिर आहे आहे. दरम्यान, भाजपाचे देशभरातील अनेक लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेतेमंडळी   मागे पडल्याचे चित्र दिसत आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

१) स्मृती इराणी 

लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची लढत ही उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभेच्या जागेवर होती, इराणी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नेते किशोरी लाल यांनी निवडणूक लढवली होती. गेल्या वेळी या जागेवर राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना भाजपाने पुन्हा एकदा तिकीट दिलं होतं. स्मृती इराणी (Smriti Irani) यांना यावेळी काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. स्मृती इराणी यांच्या विरोधात किशोरी लाल यांनी १ लाख ६५ हजार ९२६ मतांची आघाडी घेतली आहे.

२) रावसाहेब दानवे 

मराठवाड्यातील बहुचर्चित जालना लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलला मतदारांनी ‘चकवा’ देण्याचे ठरवले की काय असे चित्र समोर येत आहे. या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत आहेत. जालना लोकसभा मतदार संघात उमेदवार डॉ. कल्याणी काळे यांचा विजय झाला असून, ९९ हजार ९५२ मतांनी आपला स्वीकारावा लागला. सातत्यानं २५ वर्ष रावसाहेब दानवे (RavSaheb Danve) हेच खासदार राहिले होते. पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण यावेळी या ठिकाणी भाकरी फिरल्याचं चित्र आहे.

३) भारती पवार 

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी तब्बल १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढत झाली होती. यामध्ये भास्कर भगरे हे १ लाख १३ हजार मतांनी विजयी झाले.   

(हेही वाचा – Raj Thackeray यांचा पायगुण; ‘त्या’ चार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयी)

४) कपिल पाटील 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा 79 हजार 916 मतांनी पराभव केला आहे. भिवंडी हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात लढत झाली. 

५) अर्जुन मुंडा 

झारखंडमधील खूंटी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अर्जुन मुंडा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी त्यांचा १४९६७५ मतांनी पराभव केला. काली चरण यांना ५४.६२ टक्के मतांसह एकूण ५११६४७ मते मिळाली. अर्जुन मुंडा यांना ३८.६४ टक्के मतांसह केवळ ३६१९७२ मते मिळाली. 

६) राजीव चंद्रशेखर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांच्या केरळ मधील  तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याविरुद्ध लढत १६ हजार ०७७ मतांच्या फरकाने पराभूत झाले. (Lok Sabha Election Result 2024) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.