Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंना धक्का; भाजपाने दिली कलाबेन डेलकरांना उमेदवारी

डिसेंबर २०२३ मध्ये कलाबेन डेलकर यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

344
Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंना धक्का; भाजपने दिली कलाबेन डेलकरांना उमेदवारी
Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंना धक्का; भाजपने दिली कलाबेन डेलकरांना उमेदवारी

मोहन डेलकर (Lok Sabha Election 2024) आत्महत्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये जोरदार वाद रंगला होता; पण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर कुटुंबीयांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाच्या (BJP) दुसऱ्या यादीत पहिलेच नाव कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचं आहे. कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अभिनव डेलकर हे ठाकरे गटातच आहेत.

काही दिवसांपूर्वी कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. कलाबेन या ७ वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केली तेव्हा महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती. पण, आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर कुटुंबानेसुद्धा साथ सोडली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कलाबेन डेलकर यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

(हेही वाचा – PM-Suraj Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-सूरज पोर्टल’चे लोकार्पण)

कलाबेन डेलकर यांना उमेदवारी का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाल्यानंतर डेलकर कुटुंबीय पुन्हा एकदा भाजपमध्ये परत येणार अशी चर्चा रंगली होती. मोहन डेलकर हे भाजपाचे खासदार होते. २०१४च्या निवडणुकीत मोहन डेलकर पराभूत झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी ५१,२६९ मतांनी भाजपाचे उमेदवार महेश गावित यांचा पराभव केला होता. कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आता भाजपाकडून उमेदवारीही जाहीर झाली आहे.

महाराष्ट्रातले भाजपा उमेदवार

डॉ. हिना विजयकुमार गावित – नंदुरबार

डॉ. सुभाष रामराव भामरे – धुळे

स्मिता वाघ – जळगांव

रक्षा निखिल खडसे – रावेर

अनुप धोत्रे – अकोला

रामदास चंद्रभानजी तडस – वर्धा

नितीन जयराम गडकरी – नागपूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

प्रतापराव पाटील चिखलीकर – नांदेड

रावसाहेब दादाराव दानवे – जालना

डॉ. भारती प्रवीण पवार – दिंडोरी

कपिल मोरेश्वर पाटील – भिवंडी

पियुष गोयल – उत्तर मुंबई

मिहिर कोटेचा – उत्तर पूर्व मुंबई (इशान्य मुंबई)

मुरलीधर किशन मोहोळ – पुणे

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर

पंकजा मुंडे – बीड

सुधाकर तुकाराम शृंगारे – लातूर

रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर – माढा

संजयकाका पाटील – सांगली

सांगलीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांना लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरवून कार्यकर्त्यांनी खासदार संजय पाटील यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात उमेदवारी मिळणार का नाही ही शंका होती, पण भाजपाने विद्यमान खासदार संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन विश्वास दाखवला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित झाला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.