Malabar Hill Murder Case : मलबार हिल येथील महिलेच्या हत्येप्रकरणी नोकराला अटक

ही हत्या चोरीच्या उद्देशातून झाली असावी असे प्राथमिक तपासात समोर येत असले तरी हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

214
Malabar Hill Murder Case : मलबार हिल येथील महिलेच्या हत्येप्रकरणी नोकराला अटक

दक्षिण मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) येथे ज्येष्ठ नागरिक महिलेची हत्या करणाऱ्या नोकराला भुसावळ येथून मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. कन्हेया पंडित असे अटक करण्यात आलेल्या मारेकरी नोकराचे नाव आहे. (Malabar Hill Senior Citizen Women Murder Case)

दक्षिण मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला ज्योती शहा (६३) या मंगळवारी सायंकाळी मृत अवस्थेत राहत्या घरात आढळून आलेल्या होत्या. त्यांचे पती मुकेश यांचे ज्वेलरी शॉप असून मंगळवारी सायंकाळी ते घरी आले असता त्यांची पत्नी ज्योती शहा मृतावस्थेत बेडरूममध्ये होत्या, दोन दिवसांपूर्वी घरकामासाठी ठेवलेला नोकर बेपत्ता होता. (Malabar Hill Senior Citizen Women Murder Case)

(हेही वाचा – Cyber Fraud साठी वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डची किंमत १० हजार रुपये; अशी होत होती विक्री)

हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट 

मलबार हिल (Malabar Hill) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत ज्योती शहा पतीसोबत मलबार हिल (Malabar Hill), नेपियनसी येथे राहत होत्या. त्यांच्या हत्येचा संशय घरात काम करणाऱ्या नोकरावर वर्तवण्यात येत आहे. या नोकराला दोनच दिवसांपूर्वी कामावर ठेवण्यात आले होते, हत्या झाल्यापासून नोकर बेपत्ता झाला होता, ज्योती यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, ही हत्या चोरीच्या उद्देशातून झाली असावी अशी प्राथमिक तपासात समोर येत असले तरी हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Malabar Hill Senior Citizen Women Murder Case)

याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी (Malabar Hill Police) नोकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून नोकराचा शोध सुरू केला असता नोकर हा गावी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना मलबार हिल (Malabar Hill) पोलिस पथकाने भुसावळ येथून नोकर कन्हेया पंडित याला बुधवारी सायंकाळी अटक केली असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. (Malabar Hill Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.