Lok Sabha Election 2024 : राजस्थानच्या तरुणांमध्ये राहुलपेक्षा सचिनची डिमांड

122
Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून इंडी आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, राजस्थानमधील २५ जागांवरील प्रचारासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा सचिन पायलट यांना जास्त मागणी होती, हे विशेष. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मात्र यात एक बाब प्रकर्षाने दिसून आली की राजस्थानमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापेक्षा सचिन पायलट यांची डिमांड जास्त होती. याचा अर्थ असा की सचिन पायलट राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय ठरत आहेत. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलट यांना नवव्या क्रमांकावर ठेवले होते. परंतु जनतेने त्यांना पहिल्या क्रमांकावर प्रस्थापित केले. निवडणूक प्रचारासाठी त्यांची मागणी इतर नेत्यापेक्षा सर्वात जास्त होती. राजस्थानमधील २५ जागांवर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस बघायला मिळाली. निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा वेग आला होता तेव्हा काँग्रेसने स्टार प्रचारकांना मैदानात उतरविले होते. यात पहिल्या क्रमांकावर राहुल गांधी होते. यानंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आदी नेते होते. या यादीत सचिन पायलट यांना निवडणूक प्रचार समितीत नवव्या स्थानावर ठेवले होते. मात्र राजस्थानच्या तरुणांमध्ये त्यांचीच क्रेझ बघायला मिळाली. (Lok Sabha Election 2024)

राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीत यावेळी काही जागांवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. सुमारे अर्धा डझन जागांवर काँग्रेसने भाजपासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. निवडणुकीच्या प्रचाराबाबत बोलायचे झाले तर पायलट व्यस्त दिसून आले. काँग्रेस पक्षाने पायलट यांना निवडणूक प्रचार समितीत ९ वे स्थान दिले असले तरी पायलट यांची मागणी सर्वत्र वाढली होती. (Lok Sabha Election 2024)

निवडणूक प्रचारासंदर्भात पायलटची मागणी सर्वात वर होती. प्रचार समितीत पायलटला ९ वे स्थान देण्यात आले. पण या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून कोणाला सर्वाधिक मागणी असेल तर ती म्हणजे सचिन पायलट यांनाच. अर्धा डझन लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक सभांमध्ये नुकतेच हे दिसून आले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Amit Shah : दगडफेक आतंकवाद्यांना सरकारी नोकरी नाही; अमित शाह यांचा इशारा)

पायलट यांच्या सभांना मागणी 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये सचिन पायलटना सर्वाधिक मागणी होती. दौसामध्ये मुरारी लाल मीना, झुंझुनूमध्ये ब्रिजेंद्र ओला, टोंकमध्ये हरीश मीणा, जयपूर ग्रामीणमध्ये अशोक चोप्रा आणि सीकरमध्ये सीपीआय(एम) उमेदवार अमर राम यांच्या बाजूने निवडणूक प्रचार करण्यात आला. पायलट यांनी सर्व लोकसभा उमेदवारांच्या सभांना संबोधित केले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.