Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा

101
Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम पाहायला मिळत आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये गुंतले आहेत. नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक करत ठाकरे गटाचे पदाधिकारीदेखील आपल्याला मदत करतील, असा दावा केला आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. संतोष बांगर यांनी यावेळी राहुल गांधींवर टीका केली आहे.

हादगाव येथील संवाद मिळत बोलताना आमदार संतोष बांगर यांनी हातवारे करून राहुल गांधीवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शिंदे गटाच्या वतीने आज संवाद मिळण्याचे आयोजन हादगाव येथे येथे करण्यात आले होते. यावेळी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभला आहे त्यांचे विरोधात माणूस आहे का असं म्हणत बांगर यांनी शरीराचे हाताचे हावभाव करत अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधात हायकोर्टात धाव, कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा)

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल मोठं वक्तव्य
संतोष बांगर यांनी यावेळी अजब दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ठाकरे गट (Thackeray Group) माजी खासदार सुभाष वानखडे (Subhash Wankhede) आपल्याला मदत करतील, असा दावा बांगर यांनी केला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा आपलंच काम करतील. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल आमदार बागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि हदगाव विधानसभेतून 50 -50 हजाराची लीड देणार असंही बांगर यांनी म्हटलं आहे.
नागेश पाटील अष्टीकरांवर गंभीर आरोप

नागेश पाटलांवर टीका
नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांकडून पैसे घेतले, असं म्हणत नागेश पाटील अष्टीकरांवर नाव न घेता आमदार बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन तीनशे लोकांपासून पैसे घेतले. ग्रामसेवक करतो 5 लाख, आरोग्य सेवा करतो 10 लाख, तलाठी करतो 20 लाख, आता फक्त कलेक्टर करायचं बाकी आहे. दंडावर थाप देण्यासाठी मसल लागतात. नागेश पाटील आष्टीकर डोम्या नाग आहेत. नागोबाच्या नादी लागू नका, असं म्हणत बांगर यांनी नाव न घेता नागेश पाटलांवर टीका केली आहे.

संतोष बांगरांच्या दाव्याने चर्चांना उधाण
हिंगोलीतून येऊन दंड थापटत होता, तुला दंड कसा थापटतात माहित आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुभाष वानखडे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत. त्यामुळेच बांगर यांनी केलेल्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

राहुल गांधींवर निशाणा
कळमनुरी, वसमत, हिंगोली आणि हादगाव या विधानसभेतून 50-50 हजाराच्या वर लीड देणार, 2024 च्या विधानसभेला आपल्याला बाबुराव कदम उमेदवार पाहिजे. तिकीट आपलाच आहे, उमेदवार आपलाच आहे. नरेंद्र मोदीचं काम पाहिलं की अंगावर शहारे उभे राहतात पण तिकडून माणूस नाही, असं म्हणत बांगरचे शरीर आणि हाताचे हातवारे करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.