Lok Sabha Election 2024 अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावला! आतापर्यंत कोणाच्या किती सभा ?

165
Lok Sabha Election 2024 अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावला! आतापर्यंत कोणाच्या किती सभा ?
Lok Sabha Election 2024 अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावला! आतापर्यंत कोणाच्या किती सभा ?

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024 ) घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणुक प्रचाराच्या तोफा गुरुवारी (30 मे) सायंकाळी ५ वाजता सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवारी (१ जून) ८ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) वाराणसीचाही समावेश आहे. (Lok Sabha Election 2024 )

२०१९ मध्ये या ५७ जागांपैकी एनडीएने ३२ तर तत्कालीन यूपीएने केवळ ९ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. सध्या एनडीए व इंडिया या दोन्ही आघाड्यांनी या वेळी आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येकजण यंदा स्वतंत्र निवडणुका लढवत आहे. सात टप्प्यातील निवडणूक (Lok Sabha Election 2024 ) प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान मोदींनी किमान 200 पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शोमधून जनतेला संबोधित केले. विविध न्यूज चॅनेल्सला मिळून 80 मुलाखती केल्या आहेत. अमित शहा यांनी सुमारे २२१ सभा आणि रोड शो केले. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी १३४ सभा घेतल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा –Holiday in Mumbai : मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळांना तुम्ही भेट दिली का ?)

नरेंद्र मोदींनी सर्वाधिक 22 जाहीर सभा उत्तर प्रदेशात केल्या आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 18, कर्नाटकात 11, तेलंगणात 11, तामिळनाडूत 7 अशारितीने मोदींनी गेल्या 75 दिवसांत 180 पेक्षा जास्त सभा, रॅली, रोड शोमधून निवडणुकांचा प्रचार केला. तर, काही ठिकाणी विविध कार्यक्रमातून जनतेला संबोंधित केले. या सर्व सभा, रॅली व कार्यक्रमांची एकूण संख्या 206 एवढी आहे. दरम्यान, गत 2019 च्या निवडणुकीत मोदींनी 142 सभा, रोड शो व रॅलींमधून प्रचार केला होता. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा –वृक्ष छाटणीसाठी आता तज्ज्ञांची नियुक्ती; Deepak Kesarkar यांनी दिल्या महानगरपालिका आयुक्तांना सुचना)

नरेंद्र मोदींनी पंजाबच्या होशियारपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यानंतर, पुढील दोन दिवस ते ध्यान साधना करणार आहेत. मात्र, निवडणुकांची घोषणा झाल्यापासून नरेंद्र मोदींनी प्रचारसभा, रॅली, रोड शोंचा धडाका लावली होता. बिहारच्या जुमई येथून मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. (Lok Sabha Election 2024 )

(हेही वाचा –World No Tobacco Day : जागतिक तंबाखू विरोधी दिनाला काय केले जाते? काय आहे वैशिष्ट्य?)

तर विरोधकांत राहुल गांधींनी (Rahul gandhi) किमान १०७ सभा आणि रोड शो केले. अखिलेश यादव यांनी ६९ सभा आणि ४ रोड शो केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ६२ सभा आणि अनेक रोड शो केले. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी १४० हून अधिक रॅली आणि रोड शो केले. १०० बाइट्स/टिकटॅक्स आणि मुलाखती दिल्या. तसेच ५ वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.