World No Tobacco Day : जागतिक तंबाखू विरोधी दिनाला काय केले जाते? काय आहे वैशिष्ट्य?

कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे किंवा कमी करणे यासाठी जगभरातील लोकांमध्ये प्रचार आणि जागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो.

152
World No Tobacco Day : जागतिक तंबाखू विरोधी दिनाला काय केले जाते? काय आहे वैशिष्ट्य?

तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. धूम्रपानामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. धूम्रपान आणि तंबाखूचे नकारात्मक परिणाम माहित असूनही, जगभरातील मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादींच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका वाढतो. (World No Tobacco Day)

WHO ने तंबाखूमुळे आरोग्यावर, विशेषतः फुफ्फुसावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक मोहीम राबवली आहे. याद्वारे फुफ्फुसांच्या महत्त्वावर देखील लक्ष केंद्रित केले जाते. धुम्रपानामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर याचा खोल परिणाम होतो, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. यामुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो आणि अस्थमा सारखे काही विद्यमान फुफ्फुसांचे आजार आणखी धोकादायक ठरु शकतात. (World No Tobacco Day)

जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये तंबाखू विरुद्ध मोहिम सुरु केली आणि World No Tobacco Day या दिवस पाळण्याचा निर्णय घेतला. त्या काळात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण होते. पुढच्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये, जागतिक तंबाखू विरोधी दिन पहिल्यांदा एप्रिल महिन्यात साजरा करण्यात आला. मात्र, नंतर जागतिक तंबाखू विरोधी दिन मे महिन्यात साजरा केला जाऊ लागला. (World No Tobacco Day)

(हेही वाचा – BJP : निवडणूक निकालानंतर भाजपा ‘भाकरी फिरवणार’?)

ही आहे यावर्षीची थीम 

कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे किंवा कमी करणे यासाठी जगभरातील लोकांमध्ये प्रचार आणि जागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. अनेक जागतिक संस्था या मोहिमेत सामील होतात जसे की राज्य सरकारे, सार्वजनिक आरोग्य संस्था इत्यादी विविध प्रकारचे स्थानिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करतात. (World No Tobacco Day)

दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाची एक विशिष्ट थीम असते. या थीमचा उद्देश या माध्यमातून तंबाखूच्या सेवनावर प्रतिबंध घालणे असा आहे. यावर्षी तंबाखू निषेध दिन २०२४ ची थीम आहे Protecting Children From Tobacco Industry Interference. या थीमच्या माध्यमातून लहान मुलांना या व्यवसापासून लांब ठेवायचे आहे. लहानपणीच व्यसनाची सवय लागल्यामुळे सबंध आयुष्य बरबाद होतं. म्हणूनच लहान मुलांना या घातक सवयींपासून दूर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. (World No Tobacco Day)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.