Lok Sabha Election 2024 : एकूण सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूका; शनिवारी होणार तारखा जाहीर

काल दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर, पुढील दोन दिवसांत तारखा जाहीर करता येतील असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन नवीन निवडणूक आयुक्तांनी शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी आपला पदभार स्वीकारला.

225
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोग (Lok Sabha Election 2024) उद्या म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. शुक्रवार १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन नवीन आयुक्तांसोबतचे फोटो शेअर केले आणि सांगितले की उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे.

(हेही वाचा – Electoral Bonds : निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती का दिली? सर्वोच्च न्यायालयाने SBIला फटकारले )

सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूका :

२०१४ मध्ये ९ टप्प्यात आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ टप्प्यात निवडणुका झाल्या. यावेळीही ७ टप्प्यात निवडणुका (Lok Sabha Election 2024) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती :

काल दोन निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर, पुढील दोन दिवसांत तारखा जाहीर करता येतील असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन नवीन निवडणूक आयुक्तांनी शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी आपला पदभार स्वीकारला.

(हेही वाचा – Bombay High Court : समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; उच्च न्यायालयाचा आदेश)

मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक :

यानंतर, दोन नवीन निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तयारीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक घेतली. अकरा वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे एक तास चालली. या बैठकीत नवीन निवडणूक आयुक्तांना लोकसभा निवडणुकांच्या तयारीची माहिती देण्यात आली. निवडणुकांच्या तारखांबाबतही चर्चा झाली. थोड्याच वेळात, भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहीर केले की उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल.

(हेही वाचा – America On CAA : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवर आमचे बारकाईने लक्ष)

लोकसभेच्या एकूण ५४३ जागा :

लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) एकूण ५४३ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, आरजेडी आणि इतर पक्षांनी युती केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.