Mussoorie Hotels : टेकड्यांची राणी-मसुरीमध्ये फिरायला जाताय तर ‘या’ हॉटेल्समध्ये रहा…

मसूरी या ठिकाणी असलेले धबधबे, मंदिरे, उंच पर्वत, तलाव आणि नैसर्गिक सौंदर्य लोकांना आकृष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत.

167
Mussoorie Hotels : टेकड्यांची राणी-मसुरीमध्ये फिरायला जाताय तर 'या' हॉटेल्समध्ये रहा...

मसूरी हे उत्तराखंड राज्यातील एक हिल स्टेशन आहे. टेकड्यांची राणी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या ठिकाणी असलेले धबधबे, मंदिरे, उंच पर्वत, तलाव आणि नैसर्गिक सौंदर्य लोकांना आकृष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. सुट्ट्या घालवण्यासाठी मसुरी हे खूपच चांगले ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी येतात. (Mussoorie Hotels)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मसुरीत आल्यावर कोणत्या हॉटेलमध्ये राहायचं? तर चिंता करु नका. आम्ही तुम्हाला मसुरीतील चांगल्या हॉटेल्सची (Mussoorie Hotels) माहिती देणार आहोत.

रॉयल ऑर्किड फोर्ट रेसॉर्ट
तारा हॉल ईस्टेट, मसूरी – २४८१७९

रॉयल ऑर्किड फोर्ट रिसॉर्टमध्ये तुम्हाला शाही वागणूक मिळेल. समृद्ध, हिरवेगार परिसर आणि बर्फाच्छादित पर्वत आणि दून व्हॅलीची सुंदर दृश्ये तुम्हाला दिसतील.. हे हॉटेल प्राचीन किल्ल्याप्रमाणे बांधलेले आहे. रॉयल ऑर्किड फोर्ट रिसॉर्ट तुम्हाला राजेशाही थाट प्रदान करते. तसेच इथलं जेवण तर लाजवाब आहे. २४-तास रूम सर्व्हिस, सॅटेलाइट टेलिव्हिजन, वाय-फाय, हेल्थ क्लब, गेमिंग झोन, बँक्वेट आणि कॉन्फरन्सिंग सुविधा. आणखी काय हवं? (Mussoorie Hotels)

(हेही वाचा – America On CAA : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवर आमचे बारकाईने लक्ष)

स्टर्लिंग मसूरी
राधा भवन ईस्टेट न्यू, मसूरी – २४८१७९

या हॉटेलमध्ये (Mussoorie Hotels) कार पार्किंग आणि वाय-फाय असा विनामूल्य सुविधा असल्यामुळे तुमचा जगाशी संपर्क तुटत नाही. शेर गढीमध्ये वसलेले हे अतिशय आलिशान हॉटेल आहे. इथले कर्मचारी अत्यंत प्रेमळ असल्यामुळे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. या हॉटेलमधून तुम्ही स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना सहज भेट देऊ शकता. हे उच्च दर्जाचे ४-स्टार हॉटेल आहे. (Mussoorie Hotels)

शालोम बॅकपॅकर्स मसूरी
मॉल रोड, झुला घर, मसूरी – २४८१७९

मसुरीच्या झुला घर भागात वसलेले हे सुंदर हॉटेल… इथली खासियत म्हणजे इथलं जेवण स्वादिष्ट असतं आणि विविध प्रकारच्या पदार्थांची चव तुम्ही इथे चाखू शकता. हे अतिशय भव्य ५-स्टार हॉटेल असून इथल्या सोयी-सुविधांनी आपण एकदम प्रसन्न होतो. मसूरीत आल्यावर या हॉटेलमध्ये (Mussoorie Hotels) राहायला तुम्हाला आवडेल.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : एकूण सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूका; शनिवारी होणार तारखा जाहीर)

हॉटेल हॅमर्स इंटरनॅशनल
द मॉल रोड मसूरी, झुला घर, मसूरी – २४८१७९

हे हॉटेल मसुरीच्या (Mussoorie Hotels) सुंदर अशा झुला घर भागात वसलेले आहे. या हॉटेलची खासियत म्हणजे हे सर्व प्रेक्षणीय स्थळांपासून अगदी जवळ आहे. इथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. या हॉटेलला रेटिंग्सही चांगले मिळाले आहेत. विशेष म्हणजे खिशाला परवडणार्‍या किंमतीत तुम्ही इथे मनसोक्त राहू शकता. (Mussoorie Hotels)

आर्टबझ मसूरी
कॉटेज नं. १, २४ चमन इस्टेट, मसूरी, उत्तराखंड, चार्लेव्हिल, मसूरी – २४८१७९

मसूरीत फिरताना तुम्हाला विश्रांतीसाठी एका आरामदायक घराची आवश्यकता असते. हे हॉटेल (Mussoorie Hotels) तुमच्या घराची कमतरता पूर्ण करते. सर्व खोल्यांमध्ये मोफत वाय-फाय असल्यामुळे तुम्ही निवांत राहू शकता. तुमचा मुक्काम अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी या ४-स्टार हॉटेलमध्ये विश्रांती घ्या. (Mussoorie Hotels)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.