Lok Sabha Election 2024 : मतदार सहायता कक्षाच्या मदतीने मतदान प्रक्रिया सुलभ करण्याचा निवडणुक आयोगाचा प्रयत्न – शर्मा

147
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल

भारत निवडणुक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 (Lok Sabha Election 2024) करीता पुर्व तयारी सुरु आहे. मतदारांनी योग्य मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहे. याअनुषंगाने मतदार सहायता कक्षाच्या मदतीने मतदान प्रक्रीया सुलभ होण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Rameshwaram Cafe Bomb Blast : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस; एनआयएने प्रसिद्ध केला फोटो)

मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष (VAB) स्थापन केले जाणार असुन तेथे संबंधीत बीएलओ यांची नेमणुक केली जाणार आहे. या बीएलओंकडे मुळाक्षराप्रमाणे मतदार यादी उपलब्ध असल्याने मतदारांना यादीतील त्यांचा अनुक्रमांक शोधणे सहज सोपे होणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या भागातील मतदार यादीत आहे, त्यांचे मतदान केंद्र कोणते हे ऑनलाईन शोधण्याची सुविधा www.voters.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या पाच दिवस पूर्वी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप घरोघरी जाऊन करणार आहेत. या मतदार चिठ्ठीवरुन मतदान यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव, पत्ता याचा तपशील मतदारांना कळणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबनिहाय मतदार सहायता मार्गदर्शिका देखील दिली जाणार असुन त्यामध्ये प्रत्यक्ष ईव्हीएमवर मतदान करण्याच्या प्रक्रियाचे मार्गदर्शन कुटुंबातील सर्व मतदारांना मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024)

एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील मतदार राजाला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाण्यापुर्वी यादीतील अनुक्रमांक तसेच मतदान केंद्राचा पत्ता व मतदान प्रक्रियेची माहिती घरपोच दिली जाणार असुन प्रत्यक्ष मतदान केंद्रावर देखील मतदार सहायता कक्ष स्थापन केले जाणार आहेत. जेणेकरुन मतदारांना विनाविलंब सुलभपणे मतदान करता येईल, असे ही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.