Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

145
Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र मतमोजणी चालू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्येच येथे गोंधळ झाला आहे. या गोंधळाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गोंधळाची स्थिती निर्माण होताच, येथे पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. (Lok Sabha Election 2024)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंटांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला, तर दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा गोंधळ सोडवायचा प्रयत्न केला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड!)

दरम्यान, आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. प्रत्यक्ष मतमोजणी चालू होण्याआधी येथील प्रमुख उमेदवारांनी कोणत्याही स्थितीत माझाच विजय होणार असा विश्वास केला आहे. आम्ही निश्चिंत आहोत. या जागेवरून महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे मत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

संभाजीनगरात तिहेरी लढत, बाजी कोणाची?  

सध्या छत्रपती संभाजीनगरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या जागेवर तिहेरी लढत आहे. एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे हे या जागेवरील प्रमुख उमेदवार आहेत. ही जागा जिंकण्यासाठी या तिन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकद लावलेली आहे. त्यामुळे या जागेवर नेमकं काय घडणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.