Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड!

220
Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड!
Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड!

मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच (Lok Sabha Election Result 2024) हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड झाला आहे. हिंगोली विधासभेतील बूथ क्रमांक 8 खोली क्रमांक 1 मधील मशीनमध्ये बिघाड झाला आहे. निवडणूक साहाय्यक अधिकारी यांनी मशीन ताब्यात घेतली आहे. मशीन झालेले मतदान दाखवत आहे, मात्र कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले हे दाखवत नाही. सर्व मतमोजणी झाल्या नंतर या मशीन मधील बॅलेट पेपर चे मतदान मोजले जाणार आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात १९ जागांवर महायुती आणि १३ जागांवर मविआ आघाडीवर!)

मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: मतमोजणी सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाची कारवाई, काय झाले ? जाणून घ्या)

परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. (Lok Sabha Election Result 2024)

मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.