Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुण्यात फ्लेक्सवर कारवाई सुरू

106
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुण्यात फ्लेक्सवर कारवाई सुरू
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुण्यात फ्लेक्सवर कारवाई सुरू

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासनातर्फे राजकीय फ्लेक्स, पक्षाचे झेंडे काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. रविवारी (१७ मार्च)सायंकाळपर्यंत पूर्ण करवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील चौकाचौकांत, प्रमुख रस्त्यांवर राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यांचे फ्लेक्स लागलेले आहेत. त्यामधून प्रचार केला जातो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, १५ क्षेत्रीय स्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहेत. शनिवारी महापालिकेचे कामकाज बंद असल्याने कर्मचारी सुट्टीवर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांची जबाबदारी असलेल्या भागात कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सर्व पेठा, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, बालाजीनगर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर, संपूर्ण नगर रस्ता आदी भागात कारवाई सुरू झाली आहे.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – मधुमेहींसाठी ‘या’ पदार्थाचे सेवन फायदेशीर ठरू शकते, वाचा सविस्तर)

आचारसंहिता सुरू झाल्याने राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह अन्य व्यक्ती, संस्थांचे फ्लेक्स, बॅनर, बोर्ड काढून टाकण्यात सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल. आचारसंहितेच्या काळात आयोगाची परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पुण्याचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.