Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूत भाजपाला जयललिता यांची पोकळी भरून काढण्याची संधी

लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपाने तामिळनाडूच्या राजकारणात यूपीचा फॉर्म्युला फॉलो केला आहे. तामिळनाडूचा किल्ला फत्ते करण्यासाठी भाजपाने येथील लहान-लहान नऊ पक्षांना सोबत घेतले आहे. (Lok Sabha Election 2024)

96
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षासाठी (BJP) तामिळनाडू एक महत्त्वाचे राज्य आहे. चेन्नई राजधानी असलेल्या या राज्यात लोकसभेच्या ३९ आणि विधानसभेच्या २३४ जागा आहेत. ३३ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या राज्याच्या सीमा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळला लागून आहेत. मदुराई, त्रिची, कोईम्बतूर, सेलम, तिरुनेलवेली ही येथील प्रमुख शहरे आहेत. ब्रिटिश राजवटीत हे राज्य मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. प्राचीन काळी चेरा, चोल आणि पांड्य घराण्यांनी येथे राज्य केले. डोसा, उथप्पम, इडली हे येथील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. कांचीपुरम, महाबलीपुरम, तिरुचिरापल्ली, कन्याकुमारी आणि रामेश्वरम ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. चेन्नईचा मरिना बीच हा जगातील दुसरा सर्वात लांब बीच आहे. (Lok Sabha Election 2024)

तामिळनाडूत भाजपाचा ‘यूपी फॉर्म्युला’

लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपाने तामिळनाडूच्या राजकारणात यूपीचा फॉर्म्युला फॉलो केला आहे. तामिळनाडूचा किल्ला फत्ते करण्यासाठी भाजपाने येथील लहान-लहान नऊ पक्षांना सोबत घेतले आहे. (Lok Sabha Election 2024)

जयललिता यांची जागा भाजपा घेणार

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष अक्षरश: विखुरल्यासारखा झाला आहे. जयललिता यांचे राजकीय वारसदार पलानीसामी या निवडणुकीत अपक्ष लढत आहेत. यावरून या पक्षाची अवस्था सहज लक्षात येते. अशात, जयललिता यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी व्यापण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाची दक्षिण भारतावर नजर

उत्तर भारतात झेंडा फडकवणाऱ्या भाजपाची नजर आता दक्षिण भारतावर आहे. या प्रदेशात कमळ फुलवून एनडीएला चारशेच्या पुढे नेण्याचे मोठे उद्दिष्ट गाठता येईल, याची जाणीव पक्षाच्या रणनीतीकारांना आहे. कर्नाटकात आधीच आपली मुळे रोवणाऱ्या भाजपाचा आता विशेषकरून लोकसभेच्या ३९ जागा असलेल्या तामिळनाडूकडे लक्ष आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांची गॅरंटी ; पुढील ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवणार)

‘नवरत्न’ उपयोगी पडेल का?

द्रविड राजकारणाच्या या भूमीवर भगव्या छावणीचा मार्ग नक्कीच खडतर आहे यात शंका नाही. पण आता जातीय समीकरणांचा ‘राम-सेतू’ बांधून आव्हानांवर मात करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी यावेळी भाजपाने ‘यूपी फॉर्म्युला’ स्वीकारून छोट्या स्थानिक पक्षांशी युती केली आहे, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नवरत्न’ असे नाव दिले आहे आणि तामिळनाडूमध्ये चमत्कार होण्याची आशा आहे. (Lok Sabha Election 2024)

या पक्षांचे वर्चस्व होते

तामिळनाडूची लोकसंख्या अंदाजे ७.२ कोटी आहे, त्यात विविध जातींचे वर्चस्वही इथल्या राजकारणाची दिशा ठरवते. स्थानिक जातींवर असलेल्या त्यांच्या प्रभावामुळेच द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) यांचे दीर्घकाळ येथे वर्चस्व आहे. (Lok Sabha Election 2024)

छोट्या पक्षांचे महत्त्व काय?

तामिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुक सह विविध जातींचे राजकारण करणाऱ्या लहान लहान पक्षांचाही प्रभाव आहे. याचाच फायदा द्रमुकने २०१९ च्या निवडणुकीत उचलला. द्रमुकने पाच पक्षासोबत आघाडी केली आणि ३९ पैकी ३८ जागांवर विजय प्राप्त केला. (Lok Sabha Election 2024)

अन्नाद्रमुकशी भाजपाने संबंध तोडले

तामिळनाडूत स्वत:साठी जमीन तयार करणाचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील सात पक्षांच्या आघाडीचा भाग होता. मात्र, पदरी निराशा पडली. परंतु भाजपाने यावेळी स्वत:चे महत्व वाढविण्यासाठी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा द्रमुकशी संबध तोडून भाजपाने २०२४ ची रणनीती बनविली आहे. (Lok Sabha Election 2024)

एनडीएच्या शिबिरात नऊ मित्र

आता या वेळी निवडणूक रिंगणात द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीत आठ पक्ष, अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत चार पक्ष आणि भाजपाप्रणित रालोआची सात पक्षासोबतची आघाडी मैदानात आहे. यात तामिळनाडूमध्ये, भाजपा PMK, TMC(M) आणि AMMK सारख्या पक्षांचा समोवश आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा हात धरून त्यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अशाप्रकारे, तिसरी आघाडी म्हणून उदयास आलेल्या एनडीए कॅम्पमध्ये नऊ मित्रपक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यास नवरत्न नाव दिले आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने पीएमकेला १० जागा का दिल्या?

वास्तविक भाजपाच्या या युतीमागे जातीय समीकरणे आहेत. पक्षाचे रणनीतीकार पट्टाली मक्कल काची (PMK) सर्वात मजबूत मित्र पक्ष आहे. भाजपा स्वतः १९ जागांवर लढत आहे आणि यातील दहा जागांवर अन्नाद्रमुकमधून आलेले नेते भाजपाचे उमेदवार आहेत. कारण राज्यातील सुमारे १४-१५ टक्के लोकसंख्या वेन्नियार जातीची आहे. उत्तर तामिळनाडूतील अनेक समाजाचा मोठा प्रभाव आहे. पीएमकेचे राज्य विधानसभेतही पाच सदस्य आहेत. (Lok Sabha Election 2024)

टीटीव्ही दिनाकरन यांना दोन जागा मिळाल्या

तमिळ मानिला काँग्रेस (मूपनार) तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या या पक्षाचे संस्थापक जीके मूपनार हे राज्यातील प्रभावी ओबीसी नेते राहिले आहेत आणि आता पक्षाची कमान त्यांचे पुत्र जीके वासन यांच्या हाती आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (AMMK) यांना दोन जागा दिल्या आहेत, ज्यांचे नेते TTV दिनाकरन आहेत. ते अन्नाद्रमुकच्या माजी नेत्या शशिकला यांचे पुतणे आहेत. राज्यात चांगली राजकीय प्रतिष्ठा असण्यासोबतच दिनकरन हे थेवर समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. या समाजाची लोकसंख्या सहा ते सात टक्के आहेत आणि दक्षिण तामिळनाडूमधील सुमारे अर्धा डझन जागांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. (Lok Sabha Election 2024)

याशिवाय भाजपाने एसपीए, आयएमकेएमके, पीएनके आणि टीएमएमके यांना प्रत्येकी एक जागा देऊन जातीय प्रभाव असलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एका जागेवर माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम लढत आहेत. एनडीएच्या पाठिंब्याने ते अपक्ष उमेदवार असतील. (Lok Sabha Election 2024)

तामिळनाडूत भाजपाचा यूपी पॅटर्न

विशेष म्हणजे यावेळी भाजपासोबत उभ्या असलेल्या पक्षांचा अत्यंत मागास आणि मागासलेल्या जातींवर स्वतःचा प्रभाव आहे आणि राज्यातील ओबीसी लोकसंख्या सुमारे ६८ टक्के आहे. उत्तर प्रदेशात भाजपने राष्ट्रीय लोक दल, अपना दल (एस), निषाद पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभाषपा) या पक्षांच्या मदतीने जातीय समीकरणे सोडवली आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा)

अन्नामलाई भाजपाचे ट्रबलशुटर

भाजपाने तामिळनाडूतील निष्कलंक प्रतिमेचे आयपीएस अधिकारी अन्नामलाई यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली आहे. अण्णामलाई यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर भाजपाने अण्णाद्रमुकशी युती तोडण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि अण्णामलाई यांना किती महत्त्व आहे हे यावरून सिध्द होते. (Lok Sabha Election 2024)

डीएमकेची आठ पक्षांची आघाडी

एम. करूणानिधी यांचा डीएमके यावेळेस आठ पक्षांना सोबत घेऊन रिंगणात उतरला आहे. डीएमके २२ जागा लढविणार आहे. तर, काँग्रेस (९), सीपीआय (एम) (२), सीपीआय (२), इंडियन मुस्लिम लीग (१), विदुथलाई चिरुथाईगल काची (२), मारुमालार्ची द्रविड यांचा समावेश आहे. मुन्नेत्र कळघम (१), आणि कोंगुनाडू मक्कल देसिया काची (केएमडीके) या पक्षाचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

दुसरी आघाडी आहे ती जयललीता यांच्या अन्नाद्रमुकची. यात अन्नाद्रमुक (३४) आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (५) जागा लढविणार आहे. याव्यतिरिक्त, पुथिया तामिळगम आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार अन्नाद्रमुकच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

याशिवाय, माजी मुख्यमंत्री आणि अन्नाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी व्यापण्याची हीच संधी असल्याचे हेरून मोदी येथे सक्रीय झाले आहेत. मागील पाच वर्षांपासून ते तामिळ आणि काशीचा सांस्कृतिक संबंध जुळवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)

आणखी एक महत्वाचा मुद्या म्हणजे, एम. करूणानिधी आणि जयललिता यांचं युग आता संपुष्टात आलं आहे. यामुळे तामिळनाडूत नवे युग आणि नवीन पिढीचे युग सुरू करणारी ही निवडणूक होय. उदयनिधी स्टॅलिन, अन्नामलाई ते सेल्वापेरुंथगाई आणि रम्या हरिदास स्टॅलिन यांच्या रूपाने नवीन पिढी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. (Lok Sabha Election 2024)

मागील ५० वर्षांचा इतिहास बघितला तर असं सहज लक्षात येतं की तामिळनाडूचं राजकारण हे एका चेहऱ्यांभोवती फिरत आलं आहे. जयललिता यांचा कुणी वारसदार दिसून येत नाही आहे. तर, एम करूणानिधी यांच्यानंतर स्टॅलिन यांचा चेहरा पुढे आला आहे. तरीसुध्दा, करूणानिधी यांच्याएवढी लोकप्रियता गाठण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहे. किंबहुना, दस्तुरखुद्व स्टॅलिन यांनी चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांना पुढे केले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.