Lok Sabha Election 2024 : सुजय विखे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून BJP नाराज; निवडणुकीत बसू शकतो फटका

भाजपाचे सरचिटणीस सुनील रासने यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रासने माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे.

201
Lok Sabha Election 2024 : मतदान वाढविण्यासाठी भाजपाने शोधून काढला रामबाण उपाय

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी तुतारीला मत देण्यास सांगितले असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुजय विखे म्हणाले की, “काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे (आमदार मोनिकाताई राजळे) नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका”, असे म्हणत सुजय विखे यांनी भरसभेत हात जोडले. त्यांच्या या विधानामुळे भाजपामधील मोठे नेते नाराज झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Lok Sabha Election 2024)

नगरमध्ये सुजय विखे यांचा भाषणातील तोल सुटत चालला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ‘तुतारी वाजवा’ वक्तव्यावरून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे. भाजपाचे (BJP) सरचिटणीस सुनील रासने यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रासने माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे. गेल्या पाच वर्षात कधीही सुजय विखे यांनी नागरिकांचे फोन न उचलेले नाहीत तसेच मतदारसंघात ढुंकुण देखील पाहिले नाही. त्यामुळेच आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करत आहेत. परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती.” असा टोला रासने यांनी सुजय विखेंना लगावला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pak vs NZ T20 Series : पावसापासून संरक्षणासाठी पाकमधील स्टेडिअमवर प्लास्टिक शिटचा वापर)

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’ असे म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यानंतर आता ‘आमची नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे आवाहन सुजय विखे यांनी मतदारांना केल्याने भाजपामधील मोठे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.