गड-किल्ल्यांवरील मुसलमानांच्या अतिक्रमणाविरोधात एकवटले दुर्गप्रेमी! काय करणार पुढे?

161

राज्यातील शिवकालीन, शिवपराक्रमाचे जिवंत साक्षीदार असलेले गड-किल्ले यांवर मुस्लिमांचे अतिक्रमण होत आहे, त्याकडे ना पुरातत्व विभाग पाहत आहे ना राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे अखेर दुर्गप्रेमी गड-किल्ल्यांच्या विरोधात एकवटले आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गड-किल्ल्याच्या इस्लामीकरणासंबंधी ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले. त्यावेळी राज्यातील गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी दुर्गप्रेमी एकवटले.

(हेही वाचा #SaveForts_OpposeLandJihad ट्विटर ट्रेन्डला मिळाला भरघोस प्रतिसाद)

…तर जनक्षोभ उसळेल!   

पुरातत्त्व खात्याचे कडक नियम असतात. पुरातत्व खात्याच्या अनुमतीनेच कुठलीही ऐतिहासिक वास्तू, किल्ला यांच्या संवर्धनाची कामे करता येतात; मात्र मुंबईजवळील कुलाबा किल्ल्याच्या थेट तटबंदीवरच एक मजार (थडगे) बनविण्याचा प्रयत्न व्हावा, हा एक वेगळाच उन्माद आहे. थडगे बांधून अतिक्रमण करण्याच्या केलेल्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांविरोधात खटले दाखल करून हे अतिक्रमण पूर्ण नष्ट करावे आणि किल्ला पूर्ववत स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे, असा इशारा सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे 9 वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गड-दुर्गांवर इस्लामी आक्रमण-पुरातत्व खाते करतेय काय? या विषयावर ऑनलाईन विशेष संवादही आयोजित केला होता, त्यामध्ये ते बोलत होते.

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

राज्यात अफझलखानाच्या नावे ट्रस्ट होतोय… 

महाराष्ट्रात अफझलखानाच्या नावे ट्रस्ट उभा केला जातो. महाराष्ट्रात प्रतापगड, विशाळगड, रायगड यांसह अनेक गडांवर अनधिकृत दर्गे उभारले जातात आणि त्याचे रूपांतर नंतर मोठ्या मशिदीत केले जाते. हे सर्व होऊ देणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांना महाराष्ट्रातील जनतेने जाब विचारला पाहिजे !, असे श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगली येथील माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले.

अतिक्रमणे नष्ट करावीत!

विशाळगडावर साधारणतः 64 ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील मंदिरांकडे पुरातत्व विभागासह प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात ज्या गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, त्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करुन ही सर्व अतिक्रमणे नष्ट करावीत, असे कोल्हापूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष  युवराज काटकर म्हणाले.

(हेही वाचा आता शिवडी, सरसगड, मानगड, हिराकोट गड – किल्ल्यांचे इस्लामीकरण! पुरातत्व खाते करतेय काय?)

…तर काळाच्या पडद्याआड जाईल

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे; कारण असे केले नाही तर आपला जो इतिहास आहे, तो काळाच्या पडद्याआड जाईल. केंद्र सरकार आणि केंद्रीय पुरातत्व खाते यांना पुराव्यांनिशी निवेदन दिल्यास आणि पाठपुरावा घेतल्यास नक्कीच बदल घडेल, यांविषयी आम्हाला विश्‍वास आहे, असे झुंज प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मल्हार पांडे म्हणाले.

अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला हवे!

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील 300 हून अधिक गड-किल्ले आहेत, मात्र त्यांचे आता रक्षण होताना दिसत नाही. गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे होत असून त्याचे हिरवेकरण होत आहे. रायगड, विशाळगड, प्रतापगड, शिवडी, कुलाबा यांसह महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अनधिकृत मजार, दर्गा, मशिदी उभारुन अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला हवेत, तसेच या अतिक्रमणाला जबाबदार पुरातत्व खात्यातील संबंधित दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले.

(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.