#SaveForts_OpposeLandJihad ट्विटर ट्रेन्डला मिळाला भरघोस प्रतिसाद

151

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्यातील 300 हून अधिक गड-किल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे; मात्र पुरातत्त्व विभाग आणि राज्य नि केंद्र शासन यांच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे हा ऐतिहासिक ठेवा इस्लामी अतिक्रमणांच्या विखळ्यात अडकत चालला आहे. नुकतेच रायगड, विशाळगड, कुलाबा किल्ला, लोहगड, वंदनगड आदी गड-किल्ल्यांवर अशी अतिक्रमणे असल्याचे लक्षात आले आहे. हे वेळीच रोखले नाही, तर गड-किल्ल्यांवर कबरी, दर्गे आणि मशिदी उभा राहिलेल्या दिसतील. गड-दुर्गांचे हे इस्लामीकरण रोखण्यासाठी त्यांवरील सर्व अवैध थडगी, मजारी, दर्गे, मशिदी आदी हटवण्यात याव्यात. गड-किल्ल्यांवर होत असलेला एकप्रकारचा लँड जिहाद रोखावा, या मागणीसाठी राज्यातील समस्त शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन केले. या वेळी प्रशासन, पुरातत्त्व खाते आणि केंद्र अन् राज्य शासन यांना निवेदने देण्यात आली.

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

 राज्यभरात विविध गडांच्या पायथ्याशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात गड किल्ले हिंदूंच्या अस्मिता आहे, त्याचे इस्लामीकरण खपवून घेतले जाणार नाही !, गड-किल्ल्यांची दुरावस्था असतांना पुरातत्त्व खाते काय झोपा काढत आहे का ?, हिंदू बांधवांनो जागे व्हा, आपल्या गड-दुर्गाच्या रक्षणासाठी एक व्हा ! आदी विविध हस्तफलक हातात घेऊन जागृती करण्यात येत होती. हिंदु जनजागृती समितीने याविषयी ट्वीटरवर केलेल्या #SaveForts_OpposeLandJihad या ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय ट्वीटरवर चौथ्या स्थानी ट्रेडींगवर होता. या आंदोलनाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.