Legislative Council Elections : कुणाची मते फुटणार; कोण बाजी मारणार?

विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदानामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता : महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणनितीकडे लक्ष

121
Legislative Council Election : दोन ज्येष्ठ महिला नेत्यांचे विधान परिषदेत पुनर्वसन; मंत्रीपदाची शक्यता
  • सुजित महामुलकर

राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार आहे. विधानसभेतील आमदार यासाठी मतदान करणार असून या गुप्त मतदानात ‘क्रॉस वोटिंग’ होणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना ‘क्रॉस वोटिंग’चा फटका बसला होता. तेव्हा एकसंघ असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज दोन शकले झाली आहेत. निवडणूक बिनविरोध झाली तर प्रश्न नाही पण निवडणूक झाली आणि भाजपाने जर सहावा उमेदवार दिला किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना उबाठा यांनी पक्षाबाहेरचा उमेदवार दिल्यास आमदारांची मते फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुतीतही काही आमदार नाराज असून निवडणूक झालीच तर कुणाची मते फुटणार? महाविकास आघाडी की महायुतीची? हे तेव्हाच समजणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्याचा विचार केल्यास एकूण ४८ पैकी महायुतीला कीमान ४०-४२ जागांवर यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र महायुतीचा ‘विजयरथ’ महाविकास आघाडीने १७ जागांवरच रोखला. महाविकास आघाडीला अनपेक्षित तब्बल ३१ जागा (एका अपक्षासह) मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या विधान परिषदेच्या ११ जागांवरील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Legislative Council Elections)

(हेही वाचा – Ravindra Jadeja Retirement: रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती)

आमदार करणार मतदान

विधान परिषद सदस्य विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील हे चार भाजपाचे तर महादेव जानकर हे भाजपापुरस्कृत सदस्य तसेच शिवसेना (शिंदे) पक्षाच्या मनीषा कायंदे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अब्दुल्ला खान लतीफ दुर्राणी, शिवसेना उबाठा गटाचे अनिल परब, कॉंग्रेसचे वजाहत मिर्झा आणि प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील, असे ११ सदस्य २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. या जागांसाठी १२ जुलै, २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विधान भवन येथे विधानसभेतील आमदार मतदान करतील. तर त्याच दिवशी ५ वाजल्यानंतर मतमोजणी सुरू करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पवार-ठाकरेंचे स्व-बळ अपुरे

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे ११ पैकी नऊ उमेदवार निवडून येऊ शकतात. यात भाजपाचे पाच, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर महाविकास आघाडीचे दोन निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीतील दोनपैकी काँग्रेसचा एक आमदार सहजपणे निवडून येऊ शकतो, मात्र दुसरा आमदार निवडून आणण्यासाठी त्यांना काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे, एवढे नक्की. शरद पवार गट आणि ठाकरे गट स्व-बळावर एकही उमेदवार निवडून आणू शकत नाही, पण दोघे मिळून एक निवडून आणण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे.

(हेही वाचा – धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या अल्पंसख्यांकांसाठीच्या सरकारी योजना तात्काळ बंद करा; अधिवक्ता Ashwini Upadhyay यांची मागणी)

जून २०२२ ला कॉंग्रेसची मते फुटली

अशा स्थितीत भाजपाने सहावा उमेदवार दिला किंवा महाविकास आघाडीतील शरद पवार (Sharad Pawar) गट आणि उबाठा यांनी आमदारांच्या नापसंतीचा उमेदवार दिल्यास त्यांची मते फुटाण्याची शक्यता अधिक आहे. शेकापचे जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. जून २०२२ मध्ये कॉंग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप, असे दोन उमेदवार दिले होते आणि पहिल्या पसंतीची मते हंडोरे यांना देण्याचे आदेश पक्षाने दिले असताना हंडोरे यांना कमी आणि जगताप यांना अधिक मते मिळाली आणि हंडोरेंना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीनंतर त्यांनी ‘माझ्याच पक्षातून माझा पराभव करण्यात आला’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पवार-ठाकरेंकडून महायुतीला धक्का?

लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीचे सुरू असलेले हे पावसाळी अधिवेशन या ‘टर्म’मधील शेवटचे अधिवेशन आहे. या आधिवेशनच्या निमित्ताने आमदारांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या रोजच गाठीभेटी होत आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच महायुतीमध्येही अंतर्गत धुसपूस पाहावयास मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे काही आमदार नाराज असून त्यांना पुन्हा शरद पवार गटाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार उबाठाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटांकडून महायुतीला धक्का देण्याचे जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. लोकसभा जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यावरून महायुतीच्या उमेदवारांमध्ये नाराजी होती. आता मतदारसंघ विकास कामांचा वाढीव निधी की आगामी विधानसभा उमेदवारी ‘सुरक्षित’ करण्यासाठी आमदार काय भूमिका घेतात, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीकडे संगळ्याच्या नजरा लागल्या असून या गुप्त मतदानात महायुती बाजी मारते की शरद पवार-ठाकरे जोडी, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हेही वाचा – संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ ची मागणी करतील असे ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणा; T. Rajasingh यांचे हिंदूंना आवाहन)

WhatsApp Image 2024 06 30 at 7.46.03 PM

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.