Kokan Politics : शरद पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपाच्या वाटेवर

243
Kokan Politics : शरद पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपाच्या वाटेवर
Kokan Politics : शरद पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपाच्या वाटेवर

कोकणात महायुतीची हालचाल वेग घेतेय आणि पवार गटाचे अस्तित्व धोक्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपामध्ये प्रवेश करणार असून या प्रवेशामुळे कोकणातील पवार गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. (Kokan Politics)

भाजपा (BJP) आणि शिंदे गटाने शिवसेनेला गळती लावलीच, पण आता पवार गटालाही गडगडवण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशांत यादव (Prashant Yadav) हे मूळचे शिंदे गटाचे ‘टार्गेट’ होते. मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार किरण सामंत (Kiran Samant) यांच्या सततच्या संपर्कात असतानाच भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) सामंतांना चकवून यादवांना आपल्या गळाला लावलं. या प्रवेशामुळे भाजपाने केवळ सामंतांना धक्का दिला नाही, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासमोर २०२९ साठीचा उमेदवारही उभा केला आहे. (Kokan Politics)

(हेही वाचा – Article 370 रद्द केल्यानंतरची सहा वर्ष; जम्मू-काश्मीरच्या विकासाला मिळतेय गती)

मागील निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत झालेले यादव आता भाजपाच्या खांद्यावर बसून पुढील पाच वर्षांत राजकीय ताकद मिळवतील आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार होतील, असा विश्वास नितेश राणेंनी (Nitesh Rane) व्यक्त केला आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा (BJP) स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत राणेंनी दिले आहेत. (Kokan Politics)

दरम्यान, महायुतीतल्या बेबनावालाही उघडं करत राणेंनी उदय सामंतांवर थेट हल्ला चढवला आहे. “आमदारांना २० कोटी मिळतात, मग केंद्रीय मंत्री नारायण राणेंना केवळ पाच कोटीच का?” — असा सवाल करत त्यांनी सामंतांना सरळ आव्हान दिलं. (Kokan Politics)

यामुळे कोकणातील राजकारण अधिक तापलं असून समीकरणं आता स्पष्टपणे शिवसेना विरुद्ध भाजपा विरुद्ध अजितदादा अशी त्रिकोणी होत चालली आहेत. (Kokan Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.