Aligarh : आता अलिगडचेही नाव बदलणार; योगी सरकारने दिले संकेत

102
अलिगडमध्ये सोमवारी माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह उर्फ ​​बाबूजी यांना दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. पण या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी थेट अलिगडचे नाव बदलण्याचेच संकेत दिले.
उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी सर्वप्रथम जय श्री रामची घोषणा दिली. एवढेच नाही तर प्रचंड गर्दी असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी अलिगडचे नाव बदलण्याचे संकेतही दिले. हरिगडच्या लोकांनी…म्हणा, जय श्री राम… बाबूजींचे स्वप्न अयोध्येत पूर्ण होत आहे. यापेक्षा मोठे दुसरे काहीही असू शकत नाही.

बाबूजींचा मोठा त्याग – अमित शहा 

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मागासांसाठी काम करणाऱ्या दिवंगत बाबूजी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी दिल्लीहून आलो आहे. तो काळ असा होता की, अयोध्येत रामभक्तांची गर्दी होत होती. सेवकांना थांबवायचे होते त्यावेळी बाबूजींनी गोळी न चालवण्याची भूमिका घेतली. त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला, हा मोठा त्याग होता. बाबूजींना गरीब आणि दलितांबद्दल अपार करुणा होती. ज्या दिवशी पीएम मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले. मी बाबूजींना फोन करून सांगितले. त्यांनी उत्तर दिले की माझे जीवन धन्य झाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री योगी?

बाबूजी विचार करत असतील, ज्यासाठी सत्ता सोडली ते राम मंदिर बांधले आहे. जेव्हा पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले, तेव्हा लोकांना सुशासन कसे असते हे कळले. 1991 मध्ये कल्याण सिंह यांनी अलीगढला नवी ओळख देण्यासाठी स्वतंत्र तालानगरी स्थापन केली. मला आनंद आहे की 2017 मध्ये ही ओळख जागतिक स्तरावर पोहोचली आहे. स्वर्गीय कल्याण सिंह यांना आज समाधान वाटत असेल. ज्या कामासाठी मी 1992 मध्ये सरकार सोडले ते काम पूर्ण झाले आहे, राम मंदिर बांधले आहे. आज आपण बाबूजींच्या पुण्यतिथीला एकत्र आलो आहोत. डबल इंजिन सरकारने बाबूजी कल्याण सिंह यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त पहिल्या कॅन्सर संस्थेला त्यांचे नाव दिले. त्यांच्या स्मृतीस मी आदरांजली अर्पण करतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.