PM Narendra Modi : काँग्रेसला १०० वर्षे सत्तेपासून दूर ठेवा, अन्यथा…; पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

60

सध्या मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या ठिकाणी प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसला १०० वर्षे सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा देशाच्या प्रगतीला रिव्हर्स गिअर पडेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर 

मध्य प्रदेशातील निवडणूक अवघ्या ४ दिवसांवर आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मध्य प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, एका रॅलीला संबोधित करताना, काँग्रेसला १०० वर्षे तरी सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा देशाच्या प्रगतीला रिव्हर्स गिअर लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी  (PM Narendra Modi) काँग्रेसवर हल्लाबोल केला.

(हेही वाचा National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार)

भाजपला मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यास मदत

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम रोखण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. प्रभू श्रीरामांना काल्पनिक असल्याचे भासवले. काँग्रेस हिंदूविरोधी आहे. तसेच काँग्रेसच्या काळापासून सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या सुमारे १० कोटी बनावट लाभार्थ्यांचा आम्ही शोध घेतला आणि त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकले, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तुमच्या एका मताने भाजपला मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यास मदत होईल. दिल्लीतील भाजप सरकारला बळ मिळेल आणि राज्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवेल, असे आवाहन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  यांनी केले. केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.