Jitendra Awad यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी; डॉ. राजू वाघमारे यांची मागणी

110
मनुस्मृती पेटवली Jitendra Awhad यांनी मात्र, भडका उडाला NCP च्या मंत्र्यांमध्ये

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा, आंबेडकरी जनतेचा अपमान असून जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध तर करतोच पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांनी बुधवारी येथे एका घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. (Jitendra Awad)

वाघमारे पुढे म्हणाले की, एकीकडे जय भीम म्हणायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांबद्दल मनात असलेला राग अशा प्रकारे बाहेर काढायचा, अशा दुहेरी मानसिकतेमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आव्हाड आहेत.या कृत्यानंतर आव्हाड यांचे माफी मागणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असून हे मगरीचे अश्रू आहे यांना काही किंमत नाही, असेही वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले. मनुस्मृतीच्या बाबतीत दिल्लीमधून आलेल्या शिफारशींबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आम्ही त्या सर्व शिफारशी स्वीकारणार नाही हे या अगोदरच स्पष्ट केले आहे. मग ज्या गोष्टी अभ्यासक्रमात घेणार नाही, त्यासाठी हा स्टंट करण्याची काय आवश्यकता होती? असा सवालही वाघमारे यांनी उपस्थित केला. (Jitendra Awad)

बाबासाहेबांचा फोटो आहे, असे त्यांचा कार्यकर्ता सांगत असताना सुद्धा आव्हाडांनी त्याकडे लक्ष न देता तो फोटो फाडला हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाबद्दल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awad) गुन्हा दाखल व्हावाच अशी आमची शिवसेना पक्षातर्फे सरकारकडे मागणी आहे. कारण डॉ. आंबेडकरांचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. मग तो कितीही मोठा नेता असला तरी त्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे आमचे ठाम मत असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले. (Jitendra Awad)

(हेही वाचा – Jitendra Awhad : डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या ‘भगेंद्र आव्हाड’ यांना तात्काळ अटक करा – उमेश पाटील)

संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य करताना वाघमारे म्हणाले की, पगला पोपट रोज सकाळी येतो व टीका करतो. खोट्या बातम्या व अफवा पसरवतो.तो काय बोलतो याचे त्याला भान नसते, उचलली जीभ की लावली टाळ्याला असे त्याचे वागणे आहे. त्याने आमचे प्रमुख नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले की, निवडणुकीच्या वेळेस बॅगांमध्ये पैसे भरून प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी व आमच्याबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) अशा प्रकारची बेछूट विधाने करत असतात. कोणतेही कारण नसताना, कुठलाही पुरावा नसताना फक्त आमची बदनामी करण्याकरिता अशा प्रकारचे आरोप करायचे काम संजय राऊत करत आहेत.

मुळात त्यांना शिवसेना ज्या प्रकारे महाराष्ट्रात तळागाळात रुजत चाललेली आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत. हे पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जात आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. पण आता त्यांच्या तोंडाला वेसण घालण्याची वेळ आता आलेली असून आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी जर आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा सक्त इशाराही वाघमारे यांनी दिला. (Jitendra Awad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.