Jitendra Awhad : डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या ‘भगेंद्र आव्हाड’ यांना तात्काळ अटक करा – उमेश पाटील

189
Jitendra Awhad : डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या ‘भगेंद्र आव्हाड’ यांना तात्काळ अटक करा - उमेश पाटील
Jitendra Awhad : डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या ‘भगेंद्र आव्हाड’ यांना तात्काळ अटक करा - उमेश पाटील

मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली आहे. (Jitendra Awhad)

(हेही वाचा- शिर्डीला जाताय तर, Sainagar Shirdi Railway Station वरील ‘या’ सुविधा तुम्हाला माहिती पाहिजेच!)

महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार आहेत असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला. (Jitendra Awhad)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) यांची प्रतिमा फाडणारे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) तुम्ही काय कारवाई करणार आहात याचे उत्तर आंबेडकरी जनतेला दिले पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.