दहशतवादाविरोधात SIA ची कारवाई! फुटीरतावादी नेत्याचं घर सरकारनं केलं सील

91

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. अशातच जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांच्यावर कारवाई केली आहे. स्थानिक प्रशासनाने बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी (JEI) च्या 122.89 कोटींच्या 19 मालमत्ता आणि सय्यद अली शाह गिलानी यांचे दोन मजली घर जप्त करण्यात आले आहे. श्रीनगर डीएमच्या निर्णयानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) च्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली असून गिलानीचे हे घर श्रीगढमधील बारजुला भागात आहे. एसआयएने त्याच भागात आणखी एक निवासी घर जप्त केले आहे. अधिकाऱ्यांचे मते, हे घर JEI ने 1990 च्या दशकात विकत घेतले होते आणि गिलानी यांच्या नावावर नोंदणीकृत होते. गिलानी दोन हजार दशकाच्या सुरूवातीला या घरात राहत होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर घराचा वापर जेईआयच्या अमीरने केला होता.

(हेही वाचा – नवनीत राणांविरुद्ध FB वर आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाच्या अंगाशी, विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे दाखल)

स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईचा उद्देश फुटीरतावादी कारवायांसाठी निधीची उपलब्धता थांबवणे, तसेच भारताच्या सार्वभौमत्वासाठी देशविरोधी घटक आणि दहशतवादी नेटवर्कची संपूर्ण यंत्रणा उद्धवस्त करणे हा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.