Jagdeep Dhankhad: विरोधकांचा सभात्याग! सभापती म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, संविधानाला…”

90
Jagdeep Dhankhad: विरोधकांचा सभात्याग! सभापती म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, संविधानाला…”
Jagdeep Dhankhad: विरोधकांचा सभात्याग! सभापती म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, संविधानाला…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावर उत्तर दिल्यानंतर बुधवारी (३ जुलै) ते राज्यसभेत आले. सुरुवातीला त्यांचं भाषण विरोधकांनी शांतपणे ऐकून घेतले. परंतु, त्यांच्या भाषणाने पकड घेतल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी विरोधकांना समज दिली. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. या सर्व प्रकारावरून जगदीप धनखड यांनी व्यतित होऊन विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे, असं म्हटलं.

(हेही वाचा –Devendra Fadnavis: लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले…)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. मोदींनी भाषण थांबवावं, अशी मागणी होऊ लागली. मात्र, मोदी आपल्या भाषणापासून हटले नाहीत. त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. मोदी आपलं भाषण थांबवत नसल्याचं पाहून अखेर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानतंर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खेद व्यक्त केला. (Jagdeep Dhankhad)

(हेही वाचा –Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…)

ते (Jagdeep Dhankhad) म्हणाले, “अत्यंत दुःखदायक, अमर्यादित हे कृत्य आहे. मी चर्चा केली, मी अनुरोध केला. विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही अडथळ्याविना बोलण्याची संधी दिली. आज ते सदन सोडून गेले नाहीत, ते मर्यादा सोडून गेले. आज त्यांनी मला पाठ नाही दाखवली. भारतीय संविधानाला पाठ दाखवली आहे. आज त्यांनी माझा आणि तुमचा अनादर नाही केला, त्या शपथेचा अनादर केला जो संविधानाच्या साक्षीने घेतला आहे. भारताच्या संविधानाची यापेक्षा मोठी अपमानित गोष्ट असू शकत नाही. असं कसं होऊ शकतं, वरिष्ठाचं सभागृह म्हटलं जातं. आपल्याला देशाला मार्गदर्शन करायचं आहे. देशातील १४० कोटी लोक यामुळे दुःखी झाले असतील. विरोधकांनी आपलं म्हणणं मांडलं असेल तर त्यांनी सत्ताधाऱ्यांचंही म्हणणं ऐकलं पाहिजे, यालाच सभागृह म्हणतात.” असं जगदीप धनखड म्हणाले. (Jagdeep Dhankhad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.