Israeli-Palestinian conflict : भारताने इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी केली जारी

इस्त्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांनी अनावश्यक हालचाली टाळाव्यात, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे भारताने म्हटले आहे.

67

पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आता इस्त्रायलने पॅलेस्टिनच्या विरोधात युद्ध पुकारले Israeli-Palestinian conflict आहे. सध्या पॅलेस्टिनमध्ये वातावरण अत्यंत तणावाचे बनले आहे. या प्रकरणी भारत सरकारने आता इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचा बरोबर स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जरी केलेल्या नियमावलीचे पालन करण्यासही सरकारने सांगितले आहे.

काय म्हटले आहे भारत सरकारने? 

इस्त्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांनी अनावश्यक हालचाली टाळाव्यात, सुरक्षित ठिकाणी राहावे, असेही भारताने म्हटले आहे. पॅलेस्टिनींच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांत सायरन वाजले. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमध्ये संरक्षण दलाच्या मुख्यालयात सुरक्षेसंदर्भात मूल्यमापन करत आहेत. या शिवाय, इस्रायलने आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. Israeli-Palestinian conflict विरोधात इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली आहे. हमासने गंभीर चूक केल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये 21 ठिकाणी हमासच्या घुसखोर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. या सर्व घडामोडी पाहून अमेरिकेने आपण इस्रायलसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची विकृती; इस्रायलच्या महिला सैनिकाची काढली विवस्त्र धिंड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.