Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेवर काय म्हणाले राज ठाकरे?    

105

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडीमध्ये दरड Irshalwadi Landslide कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 103 जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री उशीरा दरड कोसळली. इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी प्रशासनाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

‘रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा’, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

(हेही वाचा Muslim : शनी मंदिरातला पुजारी निघाला गुल्लू खान; पोलिसांनी केली अटक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.