अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच वाढताना दिसत आहे. (Iran US Tensions) अलीकडेच अमेरिकेने पश्चिम आशियात आपली दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता गेल्या 24 तासांत अमेरिकेने 50 हून अधिक लढाऊ विमाने पश्चिम आशियात पाठवली आहेत.
(हेही वाचा – India-Pakistan Water Dispute: आता एक थेंबही मिळणार नाही! सिंधू करारानंतर रावी नदीचे पाणी रोखण्याची भारताची मोठी योजना)
यादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमेरिकन सैन्याला इशारा दिला आहे की जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यावरही असा हल्ला होईल की ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.
अमेरिकेने लष्करी तैनाती वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अमेरिकेला इशारा दिला. त्यांनी लिहिले, “अमेरिका सतत सांगत आहे की त्यांनी इराणकडे युद्धनौका पाठवली आहे. निश्चितच युद्धनौका अत्यंत धोकादायक असते, पण त्याहून अधिक धोकादायक ते शस्त्र आहे जे युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी बुडवू शकते.”
खामेनेई यांनी इराणच्या अणुऊर्जा महत्त्वाकांक्षेबाबतही मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले, “अणुऊर्जा हा आमचा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही याचा समावेश आहे. म्हणजेच सर्व देशांना अणुऊर्जा आणि अणु संवर्धनाचा अधिकार आहे. हा प्रत्येक देशाच्या हक्कांपैकी एक आहे. मग अमेरिका यात हस्तक्षेप का करत आहे?”
दरम्यान, अमेरिकन सैन्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात जिनेव्हा येथे सुरू असलेल्या चर्चेत काही प्रगती झाली आहे; मात्र अनेक मुद्द्यांवर अजून सविस्तर चर्चा करणे बाकी आहे. गेल्या आठवड्यातच अमेरिकेने आपली सर्वात मोठी युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड (USS Gerald R. Ford) पश्चिम आशियात तैनात केली होती. याशिवाय यूएसएस अब्राहम लिंकन आधीपासूनच त्या भागात तैनात आहे. आता 50 हून अधिक अतिरिक्त लढाऊ विमाने पाठवणे हे इराणवर दबाव वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. (Iran US Tensions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

