Indi alliance अधिकृतपणे फुटली; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून काँग्रेसला ‘दे धक्का’

आधी नितीश कुमार आणि आता ममता बॅनर्जी यांनी कॉँग्रेसला नाकारले आहे.

150

काँग्रेसने ज्या उत्साहाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरवण्यासाठी भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधून Indi alliance स्थापन केली होती. त्यातील घटक पक्षच आता काँग्रेसला धक्के देऊ लागले आहेत. आधी नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडले, आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा ना सोडता सर्वच्या सर्व ४२ जागांवर उमेदवार घोषित करून काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यामुळे आता ही आघाडी अधिकृतपणे फुटल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : राजस्थान सरकारचा स्वागतार्ह निर्णय; पाठ्यक्रमात शिकवणार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा इतिहास)

काय म्हटले काँग्रेसने? 

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. टीएमसीने क्रिकेटपटू युसूफ पठाणला बेरहामपूर मतदारसंघातून तिकीट दिले, असून त्यांचा सामना काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. महुआ मोईत्रा कृष्णनगरमधून निवडणूक लढवतील. विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा आसनसोलमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपाच्या अहलुवालिया यांनी जिंकली होती. विद्यमान खासदार नुसरत जहाँचे तिकीट कापले असून, हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, जगदीश चंद्र बर्मा बसुनिया कूचबिहारमधून निवडणूक लढवतील. पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्षा सयानी घोष जाधवपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने अनेकदा पश्चिम बंगालमध्ये टीएमसीसोबत जागा वाटपाची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही पक्षांनी मिळून जागा वाटपाबाबत निर्णय घ्यावा आणि इंडि आघाडीने (Indi alliance) एकत्र येऊन भाजपाशी लढावे, अशी आमची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.